अमेरिका, चीन, जपान नाहीतर हा देश 13 वर्षांपासून कमावतोय सर्वाधिक संपत्ती; वाचा… भारताचा क्रमांक
सध्याच्या घडीला अमेरिका हा देश जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम टिकवून आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेच्या जवळपास देखील कोणताही देश नाही. तर चीन आणि जपान हे देश देखील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. मात्र, आता गेल्या १३ वर्षांची देशांच्या संपत्तीच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. ज्यात मागील १३ वर्षांच्या काळात अमेरिका, चीन, जपान नाहीतर एका छोट्याशा देशाने सर्वाधिक कमाई केली आहे. त्यामुळे आता देश जगाच्या नकाशावर चांगलाच झळकताना दिसत आहे.
नैसर्गिक सांधनांच्या जोरावर वाढतीये संपत्ती
कझाकिस्तान असे या देशाचे नाव असून, या देश जगातील सर्वाधिक खनिजतेल, यूरेनियम आणि नैसर्गिक सांधनांची उपलब्धता असलेला देश आहे. या साधनसंपत्तीच्या जोरावर या देशाने, मागील १३ वर्षांच्या काळात आपल्या संपत्तीत तब्बल 190 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता अमेरिका, चीन, जपान, भारत या आघाडीच्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांना देखील आशियातील या देशाने सर्वाधिक संपत्ती कमावण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे.
2010 नंतर सर्वाधिक संपत्ती मिळवण्याच्या बाबतीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या 13 वर्षांत चीनच्या संपत्तीत 185 वाढ झाली आहे. शहरीकरण, रिअल इस्टेटची भरभराट आणि आर्थिक सेवांमध्ये वाढीमुळे चीनची संपत्ती झपाट्याने वाढली आहे. चीन हा जवळपास दोन दशकांपासून जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून आपली भुमिका पार पाडत आहे. परंतु, अलीकडच्या काही महिन्यांत चीनला आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.
आर्थिक संकटाचे प्रमुख कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदार चीनच्या बाजारातून आपला पैसा काढून घेत आहेत. चीनमधील रिअल इस्टेटच्या संकटामुळे चीनची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडण्याचा धोका आहे. याचे कारण चीनच्या अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेटचा वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे.
भारताचा क्रमांक कितवा
विशेष म्हणजे आखाती देश कतार हा गेल्या 13 वर्षांत सर्वाधिक संपत्ती कमावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2010 पासून या देशाच्या संपत्तीत तब्ब्ल 157 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गाझा पट्टीत हमाससोबतच्या युद्धात अडकलेल्या इस्रायलच्या संपत्तीत गेल्या 13 वर्षांत 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्वाधिक संपत्ती कमावणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा सातवा क्रमांक लागतो. 2010 ते 2023 दरम्यान भारताच्या संपत्तीत 133 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या यादीत भारतानंतर हाँगकाँगचा क्रमांक लागतो. चीनचा भाग बनलेल्या हाँगकाँगच्या संपत्तीत गेल्या 13 वर्षांत 127 टक्क्यांनी वाढ झाली आहे.