अनेकांना टॅटू काढण्याची खूप आवड असते. असे लोक त्यांच्या शरीरावर सर्वत्र टॅटू काढतात. वेगवेळ्या प्रकारचे विविध अर्थ सांगणारे टॅटू लोक काढतात. टॅटूचे लोकांना खूप वेड आहे.
पूर्वीचे लोक देखील टॅटू काढायचे. ज्याला गोंदण म्हणले जायचे. तुम्ही घरातल्या आजी-आजोबांच्या होतावर त्यांचे नाव, किंवा नवऱ्याचे नाव किंवा अजून इतर गोष्टी गोंदवलेल्या देखील पाहिल्या असतील. पण अलीकडच्या तरूण लोकांना याचे खूप वेड आहे.
जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा विचार केला जातो, तेव्हा येथे रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला जगातील प्रत्येकाला मागे सोडावे लागेल. कारण एका महिलेने टॅटू बनवण्याच्या बाबतीत विक्रम रचण्यासाठी, संपूर्ण शरीरावर टॅटू काढले आहेत. 36 वर्षीय अमेरिकन सैनिक मिहला एस्पेरन्स फ्युरझिनाने तिच्या शरीरावर इतके टॅटू बनवले आहेत की आता तिच्या शरीराचा एकही भाग शिल्लक नाही जिथे तिने टॅटू काढले नाहीत. या महिलेने आपल्या शरीराचे कॅनव्हासमध्ये रूपांतर केले आहे. ज्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत सुंदर डिझाइन्सचे टॅटू बनवले आहेत. तिने प्रायव्हेट पार्ट्सवर देखील टॅटू काढले आहेत
शरीराच्या प्रत्येक भागावर टॅटू
या विक्रमी महिलेने तिच्या शरीरावर जे टॅटू काढले आहेत ते एका खास थीमवर आधारित आहेत. ‘अंधाराचे सौंदर्यात रूपांतर’ या थीमवर महिलेने हे टॅटू बनवले आहेत. तसेच, तिने तिच्या शरीरात 89 बॉडी मॉडिफिकेशन केले आहेत. या मिह्लेच्या शरीराचा जवळजवळ 100 टक्के भागावर टॅटू आहेत. हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी, एस्पेरन्स फ्युरझिनाने तिच्या हात आणि पायांपासून जीभ, हिरड्या आणि अगदी डोळ्यांच्या आतील पांढऱ्या भागापर्यंत सर्व गोष्टींवर टॅटू बनवले आहेत. यासोबतच तिने तिच्या प्रायव्हेट पार्ट्ससारख्या नाजूक शरीरावरही टॅटू काढले आहेत.
गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवले नाव
22 सप्टेंबर 2023 मध्ये एस्पेरन्स फ्युरझिनाने सर्वाधिक टॅटू काढण्याचा विश्वविक्रम केला. तिजुआना, मेक्सिको येथील गिनीज वर्ल्ड बुकने या विक्रमासाठी त्यांचा गौरव केला. गिनीज वर्ल्ड बुकमध्ये समावेश झाल्यानंतर एस्पेरन्स फ्युरझिना म्हणाली की, मला सन्मानित वाटत आहे. सुरुवातीला माझा अर्ज स्वीकारला जाईल की नाही याबद्दल थोडी शंका होती. पण मी स्वत: रेकॉर्डसाठी अर्ज करून महिलांची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.