आयुर्वेद

दिसताच तोडून घ्या ‘या’ झाडाची पाने, नियमित सेवनाने शरीरातून लगेच दूर होतील ‘हे’ जीवघेणे आजार!


शेवग्याच्या शेंगांची भाजी भरपूर लोक आवडीने खातात. या शेंगा चवीला टेस्टी तर असतातच सोबतच यांचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण भरपूर लोकांनी हे माहीत नसतं की, केवळ शेवग्याच्या शेंगाच नाही तर शेवग्याच्या पानांमध्येही अनेक गंभीर समस्या दूर करण्याची क्षमता असते.

शेवग्याच्या पानांना आयुर्वेदातही खूप महत्व असून या पानांचा वापर अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, खोड आणि मूळांमध्येही खूप पोषक तत्व असतात. अशात आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या पानांचे फायदे सांगणार आहोत.

NCBI च्या एका रिपोर्टनुसार, शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर असतं. तसेच यात कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि आयर्नही भरपूर असतं. इतकंच नाही तर यात क्वेरसेटिन, क्लोरोजेनिक अ‍ॅसिड आणि बीटा-कॅरोटीनसारखे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही भरपूर असतात. या पानांचं सेवन करून 6 गंभीर आजार तुमच्या जवळपासही येणार नाहीत.

फॅटी लिव्हर

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या एका रिपोर्टनुसार, शेवग्याच्या पानांचं सेवन करून नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या समस्येपासून बचाव करता येतो. यातील पोषक तत्वांमुळे लिव्हरवरील सूज कमी होते. सोबतच याने लिव्हर डॅमेज होण्याचा धोकाही कमी होतो.

ब्लड प्रेशर

शेवग्याच्या पानांमध्ये असलेलं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट क्वेरसेटिन ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतं. सोबतच या पानांमध्ये पोटॅशिअमही असतं जे धमण्यांमध्ये ब्लड सर्कुलेशन सुरळीतपणे करतं.

डायबिटीस

शेवग्याच्या पानांमध्ये इन्सुलिनसारखा एक पदार्थ असतो. जो ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतो. त्याशिवाय शेवग्यामधील फायबरही ब्लडमध्ये शुगरचं अवशोषण कमी करतं. ज्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो.

कोलेस्ट्रॉल

शेवग्यामध्ये फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होत नाहीत आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

बद्धकोष्ठता

शेवग्याच्या पानांमध्ये आढळणारं फायबर पचन तंत्र सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतं. त्याशिवाय शेवग्यामधील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे पचनासंबंधी समस्याही दूर होतात.

लठ्ठपणा

शेवग्यामध्ये फायबर आणि प्रोटीन असतं, जे भूक नियंत्रित करण्यास मदत करतं. त्याशिवाय शेवग्यामध्ये असणाऱ्या क्लोरोफिलने वजन कमी करण्यास मदत मिळते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *