पाकिस्तानहून इराककडे यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस इराणच्या यझद प्रांतात उलटली. या अपघातात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. २१) रात्री ही घटना घडली.
बसमध्ये एकूण ५३ प्रवासी होते, त्यापैकी बहुतेक पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना शहरातील होते.
अपघातातील जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तेहरानमधील पाकिस्तानच्या राजदूतांना खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत करण्यासाठी चर्चा केली. तसेच अपघातातील बळींचे मृतदेह पाकिस्तानमध्ये परत आणण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत, असे मंत्री इशाक दार यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.