क्राईम

दुसऱ्या राज्यात गेला पती; इकडे पत्नी 12 वेळा प्रेग्नंट, मागे घडल काय ?


Crime News : रायपूर – पतीसोबत राहत नसतानाही पत्नीने 8 ते 12 वेळा गर्भपात केल्याची एक अजब घटना समोर आली आहे. उच्च न्यायालयाने हे घटस्फोटासाठीचं कारण मानलं आहे. पती-पत्नीमधील समेटाचा मार्ग बंद झाल्याने न्यायालयाने पतीची याचिका मान्य करून घटस्फोट मंजूर केला.

1996 मध्ये याचिकाकर्त्या पतीने दुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या मुलीशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं होतं. 2005 मध्ये नवरा कामानिमित्त बाहेर महाराष्ट्रात गेला. त्यानंतर त्याची केरळला बदली झाली

2006 मध्ये मुलीचा जन्म झाला. दरम्यान, पत्नी दुसऱ्या पुरुषाच्या संपर्कात आली आणि पती सोबत नसतानाही पत्नीने 8 ते 12 वेळा गर्भपात केला. प्रत्येक वेळी पतीऐवजी तिचा प्रियकर रुग्णालयात तिच्यासोबत राहिला. असं असूनही, पतीने तडजोड केली आणि तिला सोबत ठेवण्यास तयार झाला. परंतु पत्नीने दुसऱ्या पुरुषाशी संपर्क कायम ठेवला. पतीने घटस्फोटासाठी दुर्ग कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. मात्र तोंडी पुराव्याच्या आधारे पतीचा अर्ज फेटाळण्यात आला.

यावर पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती रजनी दुबे यांच्या डीबीमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने पत्नीचा 8 ते 12 गर्भपात झाल्याचा वैद्यकीय अहवाल, पतीचा भाऊ आणि तिच्या मोलकरणीचे जबाब हे ठोस पुरावे मानले आणि पतीची घटस्फोटाची याचिका मान्य केली.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान डिव्हिजन बेंचला सांगण्यात आलं की, घरात काम करणाऱ्या मुलीने महत्त्वाचं म्हणणं मांडलं आहे. मुलीने आपल्या निवेदनात म्हटलं होतं की, ‘एकदा रात्री एक माणूस मॅडमसोबत आला होता. त्यानी मला व्हरांड्यात झोपायला सांगितलं आणि दोघांनीही आत जाऊन दार बंद केलं.’ अर्जदाराच्या भावाचं म्हणणंही महत्त्वाचं होतं. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘वहिनी केरळहून येत होती, म्हणून मी तिला घेण्यासाठी रात्री 12 वाजता स्टेशनवर गेलो. पण तिथे मला दिसलं की वहिनी दुसऱ्या व्यक्तीसोबत जात होती. मी त्यांचा पाठलाग केला. घरी पोहोचताच दोघे एका रूममध्ये गेले’.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *