क्राईम

Crime News : महाराष्ट्र हादरला ! यशश्री शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय आलं समोर…


Crime News : उरणमधील 20 वर्षीय तरुणी यशश्री शिंदेच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडालीये. यशश्री शिंदे गुरुवारी घरुन निघाली पण ती परतलीच नाही. शुक्रवारी रात्री कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ मृतदेह आढळला.

 

जो यशश्री शिंदे हिचाच असल्याचं चौकशीत समोर आलं. शवविच्छेदन करताना मृतदेहाची अवस्था पाहून डॉक्टरांना ही धक्का बसला. यशश्री शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला याची रिपोर्ट समोर आला आहे. शवविच्छेदन करताना तिच्यावर बलात्कार झाला आहे का याची देखील तपासणी करण्यात आली. पण तसं काहीही झालं नसल्याचे निष्पन्न झाले आहे. खून हा एकाच व्यक्तीने केल्याचं प्रथमदर्शनी रिपोर्टमध्ये समोर आलंय.

 

2019 मध्ये यशश्रीवर लैगिंक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली याच व्यक्तीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामुळे तो जवळपास 6 महिने तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा तिचा पाठलाग सुरु केला. तिचा काट काढण्याचं त्याने ठरवलं. मृतदेह जेव्हा ताब्यात घेण्यात आला तेव्हा तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. प्राण्यांकडून तिच्या शरीराचे लचके तोडले असल्याचे प्रथम दिसून आले. आता आरोपीला पकडण्यासाठी चार टीम रवाना झाल्या आहेत.

 

नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी माहिती दिली की, यशश्री शिंदे हा वाणिज्य शाखेची पदवीधर ती एका खासगी कंपनीत डेटा काम करत होती. गुरुवारी सकाळी ती मित्राच्या घरी जाते असं सांगून निघाली होती. पण रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंब चिंतेत आलं. त्यानंतर वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

शुक्रवारी रात्री उरण पोलिसांना एक मुलगी गंभीर अवस्थेत पडली असल्याची माहिती मिळाली. प्राण्यांनी चावा घेतल्याने तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. भटक्या प्राण्यांनी तिचे मास खाल्ले होते. कमरेवर आणि पाठीवर चाकूच्या जखमा होत्या. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह मिळाल्यानंतर यशश्रीच्या कुटुंबियांना बोलवून तिचा ओळख पटवायला सांगितली. त्यानंतर तिच्या कपड्यांवरुन हा मृतदेह तिचाच असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. या हत्येमागे नक्कीच दाऊद शेख असेल असा आरोप त्यांनी पोलिसांकडे केला.

ड्रायव्हर असलेल्या दाऊद शेखने 2018 मध्ये देखील यशश्री शिंदेला आपल्या जाळ्यात ओढलं. 2019 मध्ये दाऊदने यशश्रीचे शारीरिक शोषण केल्याचं देखील समोर आले आहे. त्यामुळेच दाऊदवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आसला होता. यानंतर तो सहा महिने तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर येताच दाऊद पुन्हा एकदा यशश्रीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *