क्राईम

7 बहिणींचा एकुलता एक भाऊ, मुलीवर जडलं प्रेम, भेटायला गेला अन् घडल भयंकर कांड


दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमध्ये सात बहि‍णींच्या एकुलत्या एक भावासोबत घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला.

या कहाणीची परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. गाझियाबादमधल्या अस्तौली गावातला 20 वर्षांचा कमल हा मुलगा दानकौर पिपळका गावातल्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता. या दोघांचे नातेसंबंध होते. याच कारणावरून मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. गेल्या मंगळवारी प्रेयसीने फोन करून कमलला घरी बोलावलं. कमल त्याच्या मित्रांसह तात्काळ प्रेयसीला भेटायला गेला. कमल पिपळका गावात पोहोचताच प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे हल्ल्यावेळी ही मुलगी तिथून गायब झाली होती.

प्रेमकहाणीचा असा झाला शेवट

प्रेयसीच्या कुटुंबीयांनी कमल आणि त्याच्या मित्रांना बेदम मारहाण केली. त्यात ते अर्धमेले झाले. गावातल्या एका व्यक्तीने याबाबत त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीय दोघांना घेऊन कोतवाली पोलीस स्टेशनला आले. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात भरती केलं. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही कमल वाचू शकला नाही. कमलचे मित्र मृत्यूशी दोन हात करत आहेत. या घटनेनंतर कमलच्या सातही बहि‍णींना तीव्र दुःख झालं आहे.

कमलच्या गावातल्या लोकांनी सांगितलं, की अनेक रुग्णालयांमध्ये चकरा मारूनही त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. कमलच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीवरून गाझियाबाद पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. यात सहा जणांची नावं असून, सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

मुलीच्या कॉल हिस्ट्रीची तपासणी सुरू

गाझियाबाद पोलीस प्रेयसीच्या कॉलची हिस्ट्री तपासत आहेत. न बोलवताच कमल गावात गेला होता का, की प्रेयसीनं त्याला फोन करून बोलवलं होतं, याचा तपास केला जात आहे. पोलीस कॉल डिटेलच्या आधार तपास पुढे नेत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस कमल आणि त्याच्या मित्रांची कॉल हिस्ट्रीदेखील तपासत आहेत. दुसरीकडे कमलच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ही घटना म्हणजे सुनियोजित कट होता. यात त्या गावातील अनेक मुलंही सहभागी होती. कमलचे मित्र बरे झाले तर ती मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना बचाव करणं कठीण होईल. कारण ते कमलसोबत घटनास्थळी उपस्थित होते. कोणी तरी आमचा भाऊ आम्हाला परत करा, असा टाहो कमलच्या सात बहिणी फोडत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *