‘हे’ आहेत जगातील टॉप 10 सर्वाधिक कर्जबाजारी देश; वाचा. भारताचा क्रमांक कितवा?
WORLD NEWS
world News
‘हे’ आहेत जगातील टॉप 10 सर्वाधिक कर्जबाजारी देश; वाचा… भारताचा क्रमांक कितवा?
जगातील बलाढ्य देश असलेला अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत असल्याचे संकेत मिळाले आहे.
विशेष म्हणजे अमेरिका सर्वाधिक कर्ज असलेल्या देशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता जगातील सर्वाधिक कर्जबाजारी टॉप १० देश कोणते? त्यांच्यावर एकूण किती कर्ज आहे? आणि या टॉप १० कर्जबाजारी देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? भारतावर एकूण किती कर्ज आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. आज आपण वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत…
‘या’ देशांवर सर्वात जास्त कर्ज
वर्ल्डस ऑफ स्टॅटिटिक्सची जगातील सर्वात जास्त कर्ज असलेल्या टॉप १० देशांची यादी नुकतीच समोर आली आहे. अमेरिका हा देश सर्वात जास्त कर्ज असणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेवर एकूण 33,229 अब्ज डॉलर अर्थात 27 कोटी 73 लाख 858 कोटी रुपये कर्ज आहे. अमेरिकेनंतर चीनवर 14692 अब्ज डॉलर अर्थात 12 लाख 26 हजार 444 कोटी रुपये कर्ज आहे. याशिवाय सर्वाधिक कर्ज असलेल्या देशांच्या यादीमध्ये जपान हा तिसऱ्या स्थानी असून, जपानवर एकूण 10,797 अब्ज डॉलर म्हणजेच 9,01,301 कोटी रुपये इतके कर्ज आहे.
किती आहे भारतावरील कर्ज?
वर्ल्डस ऑफ स्टॅटिटिक्सच्या आकडेवारीनुसार, सर्वात जास्त कर्ज असलेल्या टॉप १० देशांची यादीमध्ये भारताचा क्रमांक सातवा असून, भारतावर एकूण 3057 अब्ज डॉलरचे अर्थात 2,55,189 कोटी रुपये कर्ज आहे.
ही आहे पहिल्या १० देशांची यादी
अमेरिका, चीन, जपान हे देश सर्वाधिक कर्ज असलेल्या देशांच्या यादीमध्ये अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहे. तर युनायटेड किंग्डम हा देश 3,469 अब्ज डॉलर कर्जासह या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. फ्रान्स 3354 अब्ज डॉलर्स (2,79,982 कोटी रुपये) कर्जासह पाचव्या स्थानी, इटली 3,141 अब्ज डॉलर (2,62,201 कोटी रुपये) कर्जासह सहाव्या स्थानी, भारत 3057 अब्ज डॉलर (2,55,189 कोटी रुपये) कर्जासह सातव्या स्थानी, जर्मनी 2,919 अब्ज डॉलर (2,43,669 कोटी रुपये) कर्जासह आठव्या स्थानी, कॅनडा 2,253 अब्ज डॉलर (1,88,073 कोटी रुपये) कर्जासह नवव्या तर ब्राझील 1,873 अब्ज डॉलर (1,56,352 कोटी रुपये) कर्जासह दहाव्या स्थानी आहे.