जनरल नॉलेज

जिथे संपते सूर्याची हद्द तिथूनच सुरू होतं रहस्यमय ठिकाण,येथे सोन्याचा खजीना ?


सौरमालेची सीमा जिथं संपते, तिथं ग्रहांसारख्या लाखो गोळ्यांनी बनलेली मोठ्या रुंदीची गोलाकार पट्टी आहे. हे अंतराळातलं एक रहस्यमय ठिकाण मानलं जातं. या ठिकाणी हिमाच्छादित लाखो गोळे कसे बनले, या ठिकाणी ऑक्सिजन आहे, तिथे सजीव जिवंत राहू शकतात का, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोनं असू शकतं का, या ठिकाणी आलेल्या प्रत्येक गोष्टीचं बर्फ होतं अशा अनेक गोष्टींबाबत रहस्य कायम आहे.

 

कुइपर बेल्ट हे अंतराळातील सर्वांत मोठं रहस्य असून, याविषयी जितका शोध लावण्याचा प्रयत्न केला जातो, तितकं त्याचं रहस्य आणखी वाढतं.

– कुइपर बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं असू शकतं.

– या बेल्टची किंमत ट्रिलियन डॉलर्स असल्याचा अंदाज काही जण व्यक्त करतात.

– इथलं तापमान कायम उणे 250 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते.

– या ठिकाणी बर्फाचे असंख्य तुकडे एकत्र जोडले जातात.

– इथं ऑक्सिजन असल्याने, या ठिकाणी जीवसृष्टी असू शकते, असं काही संशोधकांचं मत आहे.

– या ठिकाणी खडक, धातू, पाणी, अमोनिया आणि मिथेनसारखे गोठलेले परिवर्तनशील पदार्थ आहेत.

– याबाबत संशोधन नुकतंच सुरू झालं आहे. कुइपर बेल्टमधल्या या हिमाच्छादित परिसराला संशोधक कुइपर बेल्ट ऑब्जेक्ट (केबीओ) किंवा ट्रान्स नेपच्यूनियन ऑब्जेक्ट (टीएनओ) असं म्हणतात.

सर्वांत रहस्यमय जागा
कुइपर बेल्ट ही सर्वांत रहस्यमय जागा मानली जाते. कारण या ठिकाणी कधीच दिवस नसतो. तिथं कायम अंधार आणि खूप जास्त थंडी असते. जेव्हा सूर्यमाला तयार होत होती, तेव्हा तिच्या निर्मितीनंतर तुटलेले सर्व घटक या ठिकाणी पोहोचल्याचं मानलं जातं.

या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं बल काम करतं
या ठिकाणी एका वेगळ्या प्रकारचं बल किंवा शक्ती कार्यरत असते, हे बल तिथं फिरणाऱ्या बर्फाळ वस्तूंना सर्व बाजूंनी ढकलतं आणि नंतर सूर्य तसंच त्यांच्यातलं बल त्याचं वलय बनवत राहतं. या पट्ट्यात पृथ्वीसारखे ग्रह देखील समाविष्ट होऊ शकतात, असं मानलं जातं. आतापर्यंत झालेल्या अभ्यासानुसार, जे धुमकेतू सूर्यमालेत येतात आणि तेथून निघून जातात, त्यांची उत्पत्ती याच पट्ट्यात होते. आतापर्यंत केवळ एक अंतराळयान कुइपर बेल्टपर्यंत पोहचू शकलं आहे. नासाच्या न्यू होरायजन्स या यानाने 2015मध्ये प्लूटो, तर 2019 मध्ये अरोकोथवरून उड्डाण केलं होतं.

हजारो वस्तूंचा शोध लागू शकला नाही
कुइपर बेल्ट हा डोनटच्या आकाराच्या बर्फाळ गोळ्यांचा प्रदेश आहे. तो नेपच्यूनच्या कक्षेच्या पलीकडून सूर्याभोवती फिरतो. डच -अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ जेरार्ड कुइपर यांच्या नावावरून याला कुइपर बेल्ट हे नाव देण्यात आलं. त्यांनी 1951 मध्ये प्लुटोच्या पलीकडे असलेल्या घटकांबद्दल एक शोधनिबंध प्रकाशित केला होता. तिथे 3100 पेक्षा जास्त समान वस्तू सापडल्या आहेत. या ठिकाणी 20 मैलांपेक्षा जास्त लांब हजारो मोठ्या वस्तू असून, त्या अद्याप सापडलेल्या नाहीत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

काही वस्तूंची आपापसात टक्कर होते
कुइपर बेल्ट आता हळूहळू नष्ट होत आहे. तिथल्या वस्तू कधीकधी आपापसात धडकतात. तिथून धूळ बाहेर पडते, ती सौर वाऱ्याद्वारे सौर यंत्रणेतून वाहून जाते.

किती आहे तापमान
कुइपर बेल्टच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान सुमारे उणे 390 अंश फॅरनहाइट अर्थात उणे 235 अंश सेल्सिअस किंवा 50 केल्व्हिन म्हणजेच उणे 223 अंश सेल्सिअस किंवा उणे 370 अंश फॅरनहाइट आहे. हा अंतराळातल्या सर्वांत थंड प्रदेशांपैकी एक आहे. पृथ्वीवर वायूरूपात असलेले बरेच पदार्थ इथे बर्फाळ स्वरूपात आहेत.

अनेक लघुग्रहांमध्ये सोनं?
कुइपर बेल्टमध्ये अनेक धातूंचे लघुग्रह आहेत, जे धातूंनी समृद्ध आहेत. त्यात सोनं मुबलक प्रमाणात आहे. तथापि, खाणकाम आणि उत्खननाच्या मोठ्या खर्चामुळे अंतराळातून सोनं काढणं सध्या आर्थिकदृष्ट्या शक्य नाही.

तिथे सजीव राहू शकतात?
शास्त्रज्ञांच्या मते, कुइपर बेल्टमध्ये जीवसृष्टीसाठी पूरक स्थिती असू शकते; पण हे दर्शवणारे सबळ पुरावे उपलब्ध नाहीत. कुइपर बेल्टमधल्या वस्तूच्या पृष्ठभागाखाली सेंद्रिय रेणू असल्याचे संकेत मिळाले आहेत. सजीवांसाठी पूरक मूलभूत कार्य यापासून सुरू होतं. तथापि, नासाचे भौतिक शास्त्रज्ञ जॉन कूपर यांच्या मते, याचा अर्थ असा नाही, की कुइपर बेल्टमध्ये जीवसृष्टी आहे किंवा ती असू शकते. काही शास्त्रज्ञांच्या मते, कुइपर बेल्टमधल्या गोठलेल्या जागेत उष्ण भाग असू शकतो. हा भाग बर्फाळ पृष्ठभागाखाली पाण्याचं अस्तित्व असल्याचे संकेत देतो. कुइपर बेल्टमध्ये द्रव महासागरसुद्धा असू शकतो. यामुळे पर्यायी जैव रासायनिक घटकांसह जीवसृष्टीचा विकास होऊ शकतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *