जीवघेण्या सापांना देताय आमंत्रण,तुमच्या अंगणात आहेत ही 6 झाडं? लगेच काढून टाका
अनेक लोकांना घरासमोरील गार्डनमध्ये किंवा अगदी घरातील कुंडीतही झाडं लावायला फार आवडतं. हे लोक अनेक प्रकारची झाडं लावत राहतात. हे चांगलंही आहे. कारण घराच्या आसपास झाडं असली की हवा स्वच्छ राहाते, ऑक्सिजन मिळतो आणि सावलीही मिळते.
सोबतच हिरवळीमुळे घरालाही शोभा येते. मात्र, काही झाडं सापांना आकर्षित करतात, हे तुम्हाला माहितीये का? होय, काही झाडंही अशी असतात जी सापांना अजिबात आवडत नाहीत, तर काही अशी जी सापांना खूप आवडतात.
आपल्या आवडीच्या झाडांवर हे साप लटकतात, फिरतात किंवा लपून बसतात. वर्मवुड, लेमनग्रास, सर्पगंधा इत्यादी अशी काही झाडे आहेत ज्यांच्या वासाने काही साप पळून जातात. आज आम्ही तुम्हाला अशा झाडांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही चुकूनही तुमच्या घराच्या अंगणात किंवा बागेत लावू नका. ही झाडं लावली तर साप त्याच्या आसपास भटकतील, असं म्हटलं जातं. जाणून घेऊया कोणती झाडं सापांची आवडती आहेत, जी बागेत कधीही लावू नयेत.
चंदनाचे झाड- काही झाडे सापांसाठी घर आणि मुख्य अन्न स्रोत आहेत. ज्या झाडांची पाने खूप दाट आहेत किंवा पोकळ आहेत अशा झाडांवर जास्त राहणे पसंत करतात. वृत्तानुसार, विज्ञानाने हे देखील सिद्ध केलं आहे की सापांना वासाची तीव्र क्षमता असते. चंदनाच्या झाडावर जास्त साप राहतात कारण ते सुगंधी झाड आहे. ते चमेली आणि रजनीगंधाभोवती अधिक राहतात. सापांना राहण्यासाठी थंड, गडद ठिकाणे आवडतात. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ते चंदनाच्या झाडांभोवती राहतात. चंदनाचा कूलिंग इफेक्ट असतो, त्यामुळे तुम्हाला या झाडावर साप नक्कीच दिसतील.
लिंबूचे झाड- तुम्हाला माहित आहे का की लिंबाचे झाड असे झाड आहे जिथे सापांना राहायला आवडते? हे आंबट फळ कीटक, उंदीर आणि पक्षी खातात आणि ते तिथे तळ ठोकतात. त्यांची शिकार करण्यासाठी सापही इथे घिरट्या घालतात. तुमच्या अंगणात किंवा बागेत लिंबाचे झाड असेल तर त्यावर लक्ष ठेवा.
देवदाराचे झाड – या झाडावर साप राहतात असे म्हणतात. देवदाराची झाडे बहुतेक जंगलात आढळत असली तरी ती बरीच मोठी असतात. यामुळे सापांना सावली मिळते आणि त्यांना थंडपणाची अनुभूतीही मिळते. त्यामुळे तुमच्या घराजवळ देवदाराचे झाड असेल तर सावध व्हा.
क्लोव्हर प्लांट- ही वनस्पती जमिनीपासून फार उंच वाढत नाही. क्लोव्हर प्लांटला ट्रेफॉइल असेही म्हणतात. ते जमिनीच्या अगदी जवळ असल्याने साप सहजपणे त्याखाली लपून विश्रांती घेतात. तिथे त्यांना थंडावा मिळतो. ते सहजपणे याच्या खाली येतात आणि बसतात.
सायप्रस प्लांट (सरूचं झाड) – तुमच्या घराच्या अंगणात किंवा बागेभोवती सरूचं रोप आहे का? असेल तर सावधगिरी बाळगा, कारण ही एक शोभेची वनस्पती आहे, ज्याची पाने बारीक आहेत आणि ती झुडूपासारखी असते. ही वनस्पती दिसायला सुंदर आहे. हे दाट आकाराचे असल्याने साप सहजपणे लपतात.
चमेली- सापांनाही या वनस्पतीभोवती राहायला आवडतं. ही एक सावली देणारी वनस्पती आहे. सुख, समृद्धी, सकारात्मकता आणण्यासाठी आणि घराला सुगंधित ठेवण्यासाठी अनेक लोक चमेलीचे रोप लावतात.