राजकीय

मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशात कधीही निवडणुका होणार नाहीत !


मोदी सरकार पुन्हा आले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलले जाईल आणि यापुढे देशात कधीही निवडणुका होणार नाहीत, अशी भीती आता पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी व्यक्त केली आहे.

अर्थतज्ञ परकला प्रभाकर हे नेहमीच परखड भाष्य करतात. याआधीही त्यांनी अनेकदा मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केलेली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एका मुलाखतीत परकला प्रभाकर यांनी ही लोकसभा निवडणूक का महत्त्वाची आहे हे सांगताना भाजप आणि मोदी सरकारच्या षड्यंत्रापासून सावधानतेचाच इशारा दिला.

लाल किल्ल्यावरून ‘हेट स्पीच’ होईल

याला मारा, त्याला कापा, पाकिस्तानात निघून जा अशी प्रक्षोभक भाषणे सध्या केली जात असली तरी सध्या थोडा तरी कायद्याचा धाक आहे. मात्र तिसऱयांदा मोदी सरकार आले तर हीच चिथावणी देणारी भाषा लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या भाषणातून तुम्हाला ऐकायला मिळेल, असे परकला प्रभाकर म्हणाले. लडाख आणि मणिपूरमध्ये आज जी भयंकर स्थिती आहे ती तुम्हाला देशभरात पाहायला मिळेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

देशाची ओळख पुसणार

मोदी सरकार परत सत्तेत आले तर देशाला घटनेने जी एक चौकट आखून दिली आहे ती उद्ध्वस्त केली जाईल, संविधानच बदलले जाईल. आपल्या देशाची ओळखच बदलून टाकली जाईल, अशी भीती परकला प्रभाकर यांनी व्यक्त केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *