मुंबईराजकीय

खेकडा दाखवणे महागात पडले, खेकड्याला दोरीने लटकवल्याने त्याचा छळ झाल्याचा आरोप


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दोऱ्याला लटकवलेला खेकडा दाखवून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले होते.

मात्र आता त्यांना खेकडा दाखवणे महागात पडले आहे. प्राणी हक्क संघटना पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (PETA) ने रोहित पवार यांच्या विरोधात उपजिल्हा निवडणूक आयोग अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहत खेकड्याला बांधून छळ केल्याप्रकरणी रोहित पवारांवर कारवाई करावी अशी मागणी पेटाने केली आहे. (Catching a crab in hand was expensive for Rohit Pawar Demanding action from PETA)

निवडणूक प्रचार करतांना महाराष्ट्र आदर्श आचारसंहितेनुसार प्राण्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे तसे आदेश मुख्य निवडणूक कार्यालयाने 24 मार्च 2024 रोजी काढला आहे. आदर्श आचासंहितेबाबत निवडणूक आयोगाची नियमावली आणि 19 सप्टेंबर 2012 रोजी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेले पत्र, तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 (Prevention of Animal Cruelty Act) यांचे रोहित पवार यांनी उल्लंघन केले असल्याचा ‘पेटा इंडिया’चा आक्षेप आहे.

खेकड्याला दोरीने लटकवल्याने त्याचा छळ झाल्याचा आरोप ‘पेटा इंडिया’ संस्थेने केला आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ‘पेटा’ने शरद पवार व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पत्र पाठवले आहे. तसेच पशुवैद्यकीय सेवा आणि पुन्हा निसर्गात पुनर्वसन करण्यासाठी खेकड्याला त्यांच्याकडे देण्याची मागणी देखील ‘पेटा’ने केली आहे.

रोहित पवार यांनी खेकड्याचा केलेला वापर हा पूर्वनियोजित असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. प्रसिद्धीसाठी प्राण्याला विनाकरण दुखावले गेले आहे, त्रास देण्यात आला आहे आणि हे गैरप्रकार थांबविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे ‘पेटा इंडिया’चे कायदेविषयक सल्लागार विभागाचे शौर्य अग्रवाल यांनी म्हटले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *