अचानक झालेला भूंकप काही सेकंदामध्ये सर्वकाही उद्धवस्त करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे भूकंपाचा अंदाज बांधता येत नाही.
अशावेळी अचानक भूकंप झाला की अनेकदा जीवीतहानी होते पण प्राण्यांना मात्र भूकंप होणार असल्याची आधीच चाहूल लागते. त्यांच्याकडे ती क्षमता असते, असे अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याला भूकंप होण्यापूर्वी अंदाज येतो आणि तो पळत सुटतो. त्यानंतर घरच्या लोकांना सावध करतो.
बुधवारी सकाळी तैवानच्या पूर्व किनार्याला ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.या घटनेत काही लोक जखमी आहे तर काही लोकांचा मृत्यू झाला आहे. तैवान येथील एका घरातील हा व्हिडीओ आहे हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
A dog sensed an earthquake in Taiwan seconds before it happened and alerted its owner..🐕🐾😳 pic.twitter.com/1ELFnyCNts
— 𝕐o̴g̴ (@Yoda4ever) April 3, 2024
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की घरातील एका फर्निचरवर कुत्रा निवांत बसलेला आहे. अचानक तो जागेवर हालचाल करतो आणि त्यानंतर घरात फिरतो. जेव्हा त्याला भूकंपाचा अंदाज येते तेव्हा तो घरात पळत सुटतो. घरातील लोकांना बाहेर बोलावतो. त्यानंतर घरातील लोक धावत बाहेर येतात आणि टेबलखाली बसतात आणि व्हिडीओत तुम्हाला दिसेल की घरातील वस्तू पडतात.या भीतीने कुत्रा सुद्धा लपून एका ठिकाणी लपून बसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. आपत्ती येण्यापूर्वी त्याचा धोका जाणवण्याची कुत्र्याची क्षमता पाहून कोणीही थक्क होईल.
@Yoda4ever या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘तैवानमध्ये भूकंप येण्यापूर्वी एका कुत्र्याला धोका जाणवला आणि त्याने मालकाला सावधान केले’
या व्हिडडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘कुत्रे हे देवदूत असतात’ तर एका युजरने लिहिलेय, ‘कुत्र्याची ऐकण्याची क्षमता खूप जास्त असते.