जनरल नॉलेज

चंद्रावरही फिरता येईल आता कारमध्ये बसून,नासा चंद्रावर चालणारी कार बनविणार


वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर चालणारी कार बनविणार आहे. अतिशय प्रतिकूल हवामान तसेच परिस्थितीमध्येही ही कार आपली कामे व्यवस्थित करू शकणार आहे. ल्यूनार टेरेन व्हेईकल (एलटीव्ही) असे या कारला नाव देण्यात आले आहे.

अमेरिकेने आता पुन्हा चंद्रमोहीम हाती घेतली असून, त्यासाठी उपकरणांची नासाकडून निर्मिती केली जाणार आहे. अमेरिका अंतराळवीरांना चंद्रावर पाठविणार आहे. त्यांना चंद्रावर सहजपणे भ्रमंती करता यावी यासाठी नासा एलटीव्ही तयार करणार आहे.

अतिशय दुर्गम भागातही जाणे शक्य होणार
नासामधील शास्त्रज्ञ जेकब ब्लिचर यांनी सांगितले की, चंद्रावर ज्या अतिशय दुर्गम भागात पायाने चालत जाणे शक्य नाही, त्या भागांमध्ये एलटीव्ही या कारने अंतराळवीर जाणार आहेत. त्यामुळे अधिक सखोल संशोधन करणे शक्य होणार आहे.

विविध तंत्रज्ञानाने एलटीव्ही सुसज्ज
– चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन करण्यासाठी एलटीव्हीचा मोठा उपयोग होईल. त्यामध्ये ऊर्जा व्यवस्थापन, नेव्हिगेशन यंत्रणा, दळणवळणाची अत्याधुनिक साधने बसविण्यात येणार आहेत.
– संशोधनासाठी, उपकरणांची ने-आण करण्यासाठी, चंद्रावरून
विविध गोष्टींचे नमुने गोळा करण्यास एलटीव्हीचा वापर करतील.
– आर्टेमिस मोहिमेच्या अंतर्गत अंतराळवीरांची पहिली तुकडी चंद्रावर २०२६ साली पाठविणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *