महाराष्ट्रराजकीय

लातूरमध्ये तिरंगी लढत, सव्वा लाख मतं घेणाऱ्या वंचितकडून उदगीरकरांना तिकीट


लातूर : वंचित बहुजन आघाडीने यंदाची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाने नुकतेच 11 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षाने माढा, सोलापूर (Solapur) यासारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांत आपले उमेदवार दिले आहेत.

विशेष म्हणजे मराठवाड्यातही या पक्षाने नरसिंग उदगीरकर (Narsing Udgirkar) यांना तिकीट दिले आहे. उदगीरकर यांच्या उमेदवारीमुळे लातूरची (Latur) तिरंगी लढत होणार असून येथे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसू शकते. सध्या या जागेवर भाजपचा खासदार आहे.

नरसिंग उदगीरकर यांना तिकीट

लातूर जिल्हा हा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले आहेत.ही जागा आपल्याच ताब्यात यावी, यासाठी प्रत्येकाचा आग्रह असतो. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीनेदेखील या जागेवर आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला असून या पक्षाने येथे नरसिंग उदगीरकर यांना तिकीट दिले आहे. ते मुळचे उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथील रहिवाशी आहेत.

राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी केला होता प्रयत्न

लातूर हा राखीव लोकसभा मतदारसंघा त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना आता वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीचे तिकीट दिले आहे.

2019 साली वंचितला1 लाख 12 हजार मते

उदगीरकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकपदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते. यावेळी वंचितने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. दरम्यान 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने येथून राम गारकर यांना तिकीट दिले होते. त्यांना एकूण एक लाख 12 हजार मते मिळाली होती.

महाविकास आघाडीला बसू शकतो फटका

लातूर हा गड कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. वंचितने या जागेवर उमेदवार उभा केल्यामुळे मतफुटी होण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका मविआच्या उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी

हिंगोली : डॉ. बीडी चव्हाण
लातूर : नरसिंगराव उदगीरकर
सोलापूर : काशिनाथ गायकवाड
माढा : रमेश नागनाथ बारस्कर
सातारा : मारुती धोंडीराम जानकर
धुळे : अब्दुर रहमान
हातकणंगले : दादासाहेब दादागौडा चौगौडा पाटील
रावेर : संजय पंडित ब्राह्मणे
जालना : प्रभाकर देवमन बाकले
मुंबई उत्तर मध्य : अब्दुल हसन खान
रत्नागिर- सिंधुदुर्ग : काका जोशी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *