Navgan News

ताज्या बातम्या

छोट्याशा माऊचा सूर्य किरणांना पकडतानाचा क्यूट Video Viral


मुंबई : सोशल मीडियावर कधीकधी इतके गोंडस आणि क्यूट व्हिडीओ समोर येतात जी नेटकऱ्यांची मनं जिंकतात. अशा व्हिडीओंसाठी कधीकधी काही शब्द ही सुचत नाहीत. असाच मांजरीचा व्हिडीओ समोर आला आहे.

जो सध्या खूपच ट्रेंड होत आहेत.

प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओची सोशल मीडियावर कमी नाही. हे प्राणी कधी-कधी निरागसपणे अशा गोष्टी करतात की, प्राणी प्रेमींना त्यांच्या प्रेमात पाडतात. या व्हिडीओतील मांजरीनं ही तसंच काहीसं केलं.

या व्हिडीओमधील मांजर ही सुर्याच्या येणाऱ्या किरणांसोबत खेळत होती. खरंतर ही छोटी माऊ घरात येणाऱ्या सुर्याच्या किरणाला पकडत होती. तो कुठून आला आणि आपल्या हातात का येत नाही असा तिचा समज झाला असावा, ज्यामुळे ती इथून-तिथून उडी मारत होती.

हा व्हिडिओ ट्विटरवर @buitengebieden हँडलद्वारे पुन्हा शेअर केला गेला होता आणि मूळतः @FEELGOODPOSTSX वापरकर्त्याने पोस्ट केला होता.

व्हिडीओच्या सुरुवातीला एक मांजरीचे पिल्लू जमिनीवर चालताना दिसत आहे. सूर्यप्रकाशाजवळ आल्यावर तो क्षणभर थांबतो आणि नंतर तो प्रकार पकडू पाहातो.

ही पोस्ट 10 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट जुनी असली तरी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला लाखो लोकांनी पाहिलं आहे, तर अनेक प्राणी प्रेमींनी आपलं प्रेम कमेंटमध्ये व्यक्त केलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *