राजकीय

मनसे लोकसभा निवडणुकीतून बॅकआऊट करणार?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली?


मनसे भाजप युतीची चर्चा सुरु असतानाच यात मोठा ट्विस्ट आला आहे. मनसे लोकसभा निवडणुकीतून बॅकआऊट करणार आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

लोकसभेच्या जागांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळेच मनेसे माघार घेणार असल्याचे समजते. राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व जागांसाठी काल आक्रमक भूमिका घेतल्यानं मनसे लोकसभेची बॅकआऊट करण्याच्या मानसिकतेत आहे असं समजतंय. मनसेच्या दोन जणांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे.

महायुतीची दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळली होती. मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता असून दक्षिण मुंबईची जागा देण्यात येणार असल्याचं समजतंय. यापूर्वी ही जागा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन वेळा लढवलेली आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार की राज ठाकरे दुस-या कुणाला मैदानात उतरवणार याबाबत उत्सुकता लागली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *