आगळे - वेगळेक्राईम

गरम तव्यावर बसणाऱ्या बाबाचा खेळ खल्लास,आश्रमातच मध्यप्रदेश येथील महिलेवर तीन महीने बलात्कार


अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील तवेवाला बाबा म्हणून नावारुपास आलेला गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर यानं अनेक गुन्हे आहेत. त्याच्यावर अनेक तक्रारी दाखल असून अखेर या बाबाला अटक करण्यात आली आहे.

तव्यावरील बाबा म्हणजेच सुनील कावलकर यानं आपल्या आश्रमातच मध्यप्रदेश येथील महिलेवर तीन महीने बलात्कार केला होता. त्याची अश्लील चित्रफीत सुद्धा केली होती. कुणाला सांगितलं तर जिवानीशी मारू अशी धमकीही पीडित महिलेला दिली होती. आपल्या पतीची तब्बेत बरोबर राहत नाही. पतीचा आजार बरा व्हावा यासाठी सुनील कावलकर या बलात्कारी बाबाकडे आली होती. मात्र या भोंदू बाबाने महिलेचा गैरफायदा घेतला.

पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने 25 जानेवारीला कुऱ्हा पोलीस स्टेशन मध्ये बाबावर अत्याचार केल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनीही त्याच्याविषयी कसून तपास सुरु केला.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच हा भोंदूबाबा रफू चक्कर झाला. काल रात्री भोपाळ येथील एका लॉज मध्ये त्याला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. सध्या भोंदूबाबाला अमरावतीत आणण्यात आलं. पोलिसांना आपली ओळख पटू नये यासाठी भोंदूबाबाने आपला पूर्ण लूक बदलवत आपली दाढी आणि कटींग केली होती. दरम्यान भोंदूबाबाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का याचा तपास सध्या पोलीस करीत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *