शेत शिवार

डाळिंब, आंबा आणि अंजीर लागवडीसाठी मिळेल 1 लाख अनुदान!


शेती आणि शेती क्षेत्राशी संबंधित विविध बाबींचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. यामध्ये राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा हातभार मोठ्या प्रमाणावर लागतो.

अशा योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना देखील शेती करणे सोपे होते. या अनुषंगाने जर आपण शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा विचार केला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून तसेच फळे, फुले व भाजीपाला पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी

याकरिता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी या दृष्टिकोनातून देखील शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते.

अगदी याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून फलोत्पादन संचालनालयाकडून शेतकऱ्यांना विविध फळ पिकांच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येत असून याकरिता शेतकऱ्यांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत. याच संबंधीचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

याफळपिकांच्यालागवडीवरमिळणारअनुदान

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राज्यांमध्ये आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू तसेच मोसंबी, संत्रा, नारळ, सिताफळ, चिंच, आवळा,

जांभूळ, कोकम, फणस, चिकू आणि अंजीर इत्यादी फळ पिकांचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2024 राबवण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. या माध्यमातून अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.

फळबागलागवडीसाठीकितीमिळणारअनुदान?

महाराष्ट्र सरकारच्या फलोत्पादन संचालनालयाच्या माध्यमातून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अर्थात मनरेगा योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे

व या योजनांच्या माध्यमातून डाळिंब पिकासाठी हेक्टरी 740 झाडांकरिता एक लाख दहा हजार तर आंब्याच्या रोपांकरिता प्रति हेक्टर 100 झाडांकरिता एक लाख, संत्रा मोसंबी, कागदी लिंबू याकरिता प्रती हेक्टर 63 हजार पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

असेअसेलयाअनुदानाचेस्वरूप

त्यामध्ये पहिले हप्त्यात एकूण अनुदान रकमेच्या 50% म्हणजेच 50 हजार रुपये प्रति हेक्टर डाळिंब लागवडीची पडताळणी करून आर्थिक वर्ष 2023-24 च्या नियमानुसार देण्यात येणार आहे

तसेच फळ पिकांच्या विस्तारासाठी COE Desiri कडून निवड झालेल्या शेतकऱ्यांना रोपे प्रती हेक्टर या शिफारशीत दराने वनस्पती सामग्री उपलब्ध करून दिली जाते. अनुदान देताना पहिल्या वर्षात 50, दुसऱ्या वर्षात 30 आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के देण्यात येते.

याअनुदानाचालाभघेण्यासाठीअर्जकसाकरावा?

1- या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा.

2- अर्ज करण्याकरिता युजर आयडी पासवर्ड टाकावा व त्यानंतर कॅप्चा कोड भरून तुम्हाला लॉगिन करावे लागेल.

3- लॉगिन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल व या होम पेजवर सरकारी योजना हा एक पर्याय दिसेल.

4- या पर्यायामधून तुम्हाला फलोत्पादन हा पर्याय निवडायचा आहे व यावर क्लिक केल्यावर तुम्हाला फलोत्पादन अर्जावरील संपूर्ण माहिती भरायची आहे.

5- त्यानंतर तुम्हाला एकात्मिकफलोत्पादन हा पर्याय निवडणे गरजेचे राहील व तो पर्याय निवडून तुम्हाला विविध फळांचे ऑप्शन त्यामध्ये दिसतील.

6- यामध्ये तुम्हाला ज्या फळाकरिता अनुदान घ्यायचे आहेत त्या नावाच्या ऑप्शन वर क्लिक करून सर्व माहिती भरावी.

कुठलीकागदपत्रेलागतात?

अर्ज करताना तुम्हाला जमिनीचा सातबारा व 8 अ चा उतारा, सामायिक क्षेत्र असेल तर विहित नमुन्यातील इतर खातेदारांचे सहमती पत्र, आधार कार्ड तसेच आधार लिंक बँक खाते क्रमांक, तसेच कागदी लिंबू, संत्रा व मोसंबी या लिंबूवर्गीय फळ पिकांच्या अनुदानाकरिता माती परीक्षण अहवाल आवश्यक राहील.

अधिकमाहितीसाठीकुठेसंपर्कसाधावा?

या योजनेविषयी तुम्हाला जास्तीची विशेष माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या सहाय्यक फलोत्पादन संचालकांशी संपर्क साधू शकतात.

रेड वाईन प्यायल्याने फायदा होतो की नुकसान?


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *