गुजरातमध्ये शाळेच्या पुढील सत्रापासून ६ वी ते ८ वीपर्यंतचे विद्यार्थी भगवद्गीता शिकणार !
शिक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन !
गुजरात : गुजरातमधील शाळांमध्ये पुढील सत्रापासून श्रीमद्भगवद्गीता शिकवली जाणार आहे. २२ डिसेंबरला गीता जयंतीनिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी ही घोषणा केली.
पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना गीता शिकवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठीच्या पुस्तकांचे प्रकाशन पानशेरिया यांच्या हस्ते करण्यात आले.
सौजन्य आजतक
पानशेरिया पुढे म्हणाले की,
१. सनातन हिंदु धर्माचा सर्वांत मोठा धर्मग्रंथ असलेली ‘श्रीमद्भगवत गीता’ हे आपल्या संपूर्ण जीवनाचे सार आहे. यामध्ये अध्यात्म, व्यवस्थापन, नेतृत्व, सृजनशीलता, मूल्ये आदी उत्तम समाज घडवण्याची अनोखी सूत्रेे आहेत.
२. विद्यार्थी गीतेचे वाचन करतील, याचा मला आनंद आहे आणि जीवनातील अडचणींच्या प्रसंगी पराभव न स्वीकारता उच्च ध्येय साध्य करतील. त्यांचा दृष्टीकोन पालटेल. लहान वयात मिळालेले शिक्षण आयुष्यभर लक्षात रहाते.
सरकारच्या अंतर्गत असणार्या शिक्षण संस्थांमध्येही हिंदु धर्मग्रंथ शिकवण्याचा निर्णय घेता येईल !
मनुष्यांमुळेच पृथ्वी 200 वर्षात राहण्या लायक राहणार नाही कारण मनुष्यांचं पादणं आणि ढेकर देणं..