मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे राज्यभर सभांचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे काही कलाकार देखील मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत.
त्यात आता लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची भर पडली आहे. ‘मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी मागणी गौतमी पाटीलने केली आहे.
लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिने पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गौतमी पाटीलने मराठा आरक्षणावर मोठं केलं आहे. गौतमी पाटील म्हणाली, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आज अनेकांना आरक्षण हवंय, त्यामुळे ते मिळालंच पाहिजे. मलाही आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय’.
‘कोरोना काळात माझी परिस्थिती खूप हलाखीची झाली होती. हे क्षेत्र चालायला हवं. आता सगळं नीट सुरू आहे, असं गौतमी म्हणाली
गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटीलनं वेगळा फड निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघी एकत्र डान्स करतानाही दिसत नाहीत. यावर भाष्य करताना गौतमी पाटील म्हणाली, ‘हिंदवी पाटीलचं चांगलं होवो. आमच्यातून कोण फुटून गेलं, तर आम्ही त्याला गद्दार अजिबात म्हणत नाही. त्यांचं उलट चांगलं होऊ दे’.
गौतमीने यावेळी बोलताना राजकारणात जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.