दिवाळी हा वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आणि त्यातही आपल्याकडे दिवाळीला विशेष महत्त्व आहे. दीपावलीची सुरुवात वसूबारसेपासून होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात.
यंदा 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी आहे. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी दिवशी हा सण साजरा केला जातो.
धार्मिक मान्यतांनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनादरम्यान भगवान धन्वंतरी अमृत कलशासह प्रकट झाले. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.
या दिवशी लोक भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांच्यासह देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि आपल्या प्रियजनांना धनतेरसच्या शुभेच्छा देतात. जाणून घेऊयात काही खास दिवाळी मराठी संदेश (Diwali 2023 Marathi Wishes).
1. दिवाळी अशी खास, तिच्यात
लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुंगधी
सुवास, दिव्यांची सजली आरास,
मनाचा वाढवी उल्हास
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा (Dhanteras Wishes in Marathi)!
2. धन्वंतरी देवता आपणावर सदैव
प्रसन्न राहो आणि आपणास
सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
3. धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपल्या सदनी व्हावी बरसात धनाची
साधुनी औचित्य दीपावलीचे
बंध जुळावे मनामनांचे,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
4. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून
निघो निशा, घेऊनि येवो नवी
उमेद नवी आशा, सोबत
आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
5. ॐ श्रीं ऱ्हीं दरिद्र विनाशनि
धनधान्य समृद्धि देहि,
देहि कुबेर शंख विध्ये नम:
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा (Dhantrayodashi Hardik Shubhechcha)!
6. पणतीचा उजेड घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
7. रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखं तेजाने
उजळू दे, धन आणि
आरोग्याची साथ लाभू दे!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
8. तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्टांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
9. धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा उजळतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
10. दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो
तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य…
आमच्या आयुष्यात तुमचं
असणं हेच आमचं भाग्य…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा.
दिवाळी, ज्याला आपण दीपावली असेही म्हणतो. हा सण भारताच्या जवळपास सर्व भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा एक भारतीय सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. आनंद, सुसंवाद आणि विजयाचे स्मरण करून देणारा हा एक आनंदी क्षण कि ज्याचे वर्णन ‘प्रभू राम वनवासातून परत आल्यानंतर केलेला आनंदोत्सव’ असे महाकाव्य रामायणात केले आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. हा भारतात प्रामुख्याने साजरा केला जाणारा सर्वात मोठा आणि भव्य सण आहे. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हा सण येतो.
दिवाळीचा सण पाच दिवस चालतो- धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा संपत्तीची पूजा. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. दिवाळी उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी. या दिवशी, लोक सकाळी लवकर उठतात आणि स्नान करण्यापूर्वी त्यांना सुगंधी तेल लावतात ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व पापे आणि अशुद्धता दूर होतात. तिसरा दिवस मुख्य उत्सव असतो. या दिवशी लक्ष्मीची (संपत्तीची देवता) पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. यालाच लक्ष्मीपूजन असेही म्हणतात. लोक नवीन कपडे घालतात, पूजा करतात आणि दिवे लावून आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात. दिवाळी उत्सवाचा चौथा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा किंवा पाडवा. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने विशाल गोवर्धन पर्वत उचलून इंद्राचा पराभव केला होता असे म्हणतात. गायीच्या शेणाचा वापर करून लोक गोवर्धनाचे प्रतीक असलेली एक छोटी टेकडी बनवतात आणि त्याची पूजा करतात. दिवाळी उत्सवाचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या घरी जाऊन भवाला ओवाळतात. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात तर भाऊ त्यांच्या बहिणींना काहीतरी भेटवस्तू देतात.
वसुबारस
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !
धनत्रयोदशी
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
नरक चतुर्दशी
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो ! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
लक्ष्मीपूजन
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
भाऊबीज
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !