विशेष अधिवेशनापूर्वी भाजपच्या बैठकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, खासदाराने निमंत्रण पत्रिका फाडली अन्…
संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २२ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. यंदाचे अधिवेशन हे नवीन संसद भवनात पार पडणार आहे. विशेष अधिवेशनाच्याकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण ५ बैठका होतील.
दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी काल (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मोठा गोंधळ दिसून आला आहे.
एका निमंत्रण पत्रिकेवरून हा मोठा गोंधळ दिसून आला आहे. डीएमकेचे खासदार त्रिची शिवा यांनी निमंत्रण पत्रिकेवरून संताप व्यक्त केला. त्यानंतर सर्वांनी खासदार त्रिची शिवा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समजूत काढल्यानंतर खासदार त्रिची शिवा शांत झाले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी डीएमकेचे खासदार त्रिची शिवाही उपस्थित होते. यावेळी नवीन संसदेत झालेल्या ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेवरून मोठा ड्रामा झाला. डीएमके खासदार त्रिची शिवा यांनी बैठकीमध्येच सर्वांसमोर निमंत्रण पत्रिका फाडली. हिंदी भाषेत निमंत्रण पत्रिका होती त्याचा संताप व्यक्त करत सरकार हिंदी भाषा थोपत असल्याचा आरोप करत त्यांनी पत्रिका फाडली.खासदार त्रिची शिवा यांनी निमंत्रण पत्रिका इंग्रजीमधून का दिली नाही? हिंदी भाषेत पत्रिका का दिली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्रिची शिवा यांच्या संताप पाहिल्यानंतर इतर खासदारही गोंधळून गेले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्रिची शिवा यांची समजूत काढली. त्यानंतर ते शांत झाले. यासंबधीचे वृत्त ‘टिव्ही ९ हिंदी’ने दिले आहे.