जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांची माहिती काऱ्हाटी – बारामती जेजुरी पुणे मार्गावरील लोणी पाटी येथे शनिवारी ओबीसी समाज शनिवारी (दि.16) लोणी पाटी येथे रस्ता रोको करणार असल्याची माहिती महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांनी दिली.
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात येऊ नयेत, ओबीसी समाज पूर्वापार जातिव्यवस्थेनुसार व चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार मागासलेला आहे. ओबीसी आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी समाजाच्या संघटनांनी केली आहे. अशी माहिती लडकत
यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला दिल्यास राज्यातील ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. शिवाय मतदानातून प्रस्थापित व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्यात येईल. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यावी. ओबीसींसाठी ही आत्मसन्मानाची लढाई आहे. त्यामुळे संपूर्ण सकल ओबीसी समाज, समता परिषद, ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
लक्षवेधी मागण्या
सरकारने सरसकट कुणबी दाखले देऊ नये, धनगरी एसटी आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, बिहारप्रमाणे ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे, “महाज्योती’ करिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, एससी, एसटीप्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीत राज्यात योजना सुरू करावी, ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत करावे.