चंद्रपूरताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

चंद्रपुरात मराठा समाजाच्या मागणीविरोधात अन्नत्याग आंदोलन


चंद्रपूर; मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीकरीता सोमवारपासून चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे आंदोलनाला बसले आहेत.

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर, ॲड पुरूषोत्तम सातपुते, विदर्भ तेली समाजाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खणके, दिनेश चोखारे, सतीश भिवगडे, आकाश साखरकर, राजेंद्र खांडेकर, शाम लेडे, माली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तीखे, गणेश आवारी, हितेश लोडे, रणजित डावरे अक्षय येरगुडे, मनीषा बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन सुरू करण्यात आले.

राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी चंद्रपुरात पहायला मिळाली. मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या, मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे या मागणी विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या मागणीचा चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ओबीसी (विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे. त्यामध्ये आता मराठा समाज समाविष्ठ झाले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. आतापर्यंत मराठा समाजाने मोठमोठे मोर्चे काढून मागणी रेटून धरली आहे. मात्र आपल्याला एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. त्याचा एक भाग म्हणून चंद्रपूरात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आंदोलन सुरू केले.

मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करू नये या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा. ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्हात मुला व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरु करावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आज पासून सुरू केलेल्या आंदोलनानंतर 17 सप्टेंबरला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसीत मोडणाऱ्या सर्व जात संघटनांचा चंद्रपुरात महामोर्चा निघणार आहे. या आंदोलनात सर्व ओबीसी समाज बांधव सहभागी होणार असल्याने या आंदोलनाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *