बीड जिल्ह्यात कडकडीत बंद, अंबड चौफुली परिसरात ट्रॅक पेटवला ,दगदफेकीच्या घटना
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीहल्लाचा निषेध नाेंदविण्यासाठी बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला
आज संतप्त आंदोलकांनी जालन्यातील अंबड चौफुली परिसरात ट्रॅक पेटवला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील अंबड चौफुली परिसरात.पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला आहे. दरम्यान जालना शहरात ही दगदफेकीच्या घटना घडल्या.
दरम्यान माजलगाव येथे बंदला हिंसक वळण लागले तर जालना जिल्ह्यात देखील आंदाेलक आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले
बीडच्या मोठेवाडीत शुक्रवारी आंतरवाली सराटे येथील घटनेच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. आज सकाळपासून बीड जिल्ह्यात कडकडकीत बंद पाळण्यात आला आहे.
शहरातील मुख्य सुभाष रोड मार्केट, नगर रोड, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, धोंडीपुरा, कारंजा, जालना रोड तसेच जुना मोंढा मार्केट या ठिकाणी शंभर टक्के दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. यामुळे बीड शहरातील रस्त्यावर व मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
बीडच्या माजलगाव मध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिऴाले. शेकडोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांकडून रस्त्यावर उतरत सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला गेला.
यावेळी लाठीहल्ला व मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. माजलगाव शहरातील मुख्य चौकात मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आले तसेच मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली