सांगली जिल्ह्यात आठवड्याभरात 5 महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या घडल्या आहेत त्या जाणून घेणार आहोत.जत दुष्काळग्रस्त जनताआता एनओसी नाही, थेट कर्नाटक मध्ये जाण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करणार : पाणी संघर्ष समितीचा राज्य सरकारला अल्टिमेटम.सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जत तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मात्र पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जात नसल्याचा आरोप करत पाणी संघर्ष समितीच्या वतीने आता पुन्हा आरपारची लढाई सुरू केली आहे.राज्य सरकारने मंजूर केलेल्या विस्तारित म्हैशाळ सिंचन योजनेचे संपूर्ण टेंडरची प्रक्रिया पूर्ण करावी,त्याचबरोबर कर्नाटक राज्यातल्या तुबची बबलेश्वर योजनेतून सीमा भागातल्या गावांना पाणी देण्याबाबत पाऊल उचलावं, यासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होत. त्यामध्ये तालुक्यातील दुष्काळग्रस्त त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.राज्य सरकारला पाणी संघर्ष समितीच्या वतीने आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे आठ दिवसात राज्य सरकारकडून जर दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत धोरण घेतलं नाही, तर राज्य सरकारची कोणत्याही एनओसीची वाट न बघता थेट कर्नाटक मध्ये जाण्याची भूमिका पुन्हा जाहीर करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी आठ दिवसानंतर जत तालुक्यातल्या 80 गावांमध्ये पदयात्रा काढून गावागावात जागृती करत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून कर्नाटक मध्ये जाण्याबाबतचा ठराव करण्यात येईल,त्याचबरोबर कर्नाटक राज्याच्या मंत्र्यांची भेट देखील घेणार असल्याचा पाणी संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाच्या दालनात आटपाडी तालुक्यातील दोन नेत्यांत खडाजंगी :सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दोन नेत्यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाच्या दालनात चांगलीच सोमवारी खंडाजंगी झाली.
शिवसेना शिंदे गटाचे संचालक तानाजी पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यात तालुक्यातील राजकीय वादावरून ही खडाजंगी झाली. यामध्ये देशमुख यांनी तानाजी पाटीलनी आपापल्या जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलीस अधिक्षकांच्याकडे तक्रार केली आहे. आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखान्यावरुन जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे संचालक तानाजी पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यात खडाजंगी झाली आहे. संचालक मंडळाची सोमवारी दुपारनंतर बैठक होती.Yavatmal News: नोकरीचं आमिष दाखवत 47 लाखांचा गंडा, दुचाकी चोरी करणारी टोळी जेरबंद, यवतमाळमधील 5 मोठ्या घडामोडीया बैठकीसाठी संचालक आले होते.
अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कक्षात चर्चा करीत बसले होते. हणमंतराव देशमुख यांनी बॅंकेच्या ताब्यात असलेला माणगंगा साखर कारखाना संचालक पाटील यांच्याशी सबंधित कंपनीला चालविण्यास देण्याबाबत तक्रार केली आहे. कोणत्या नियमाने कारखाना दिला अशी विचारणा केली आहे. यावरुन संचालक तानाजी पाटील यांनी अध्यक्ष मानसिंग नाईक यांच्या केबीन मध्ये बसलेल्या हणमंतराव देशमुख यांना का माझ्याबद्दल तक्रारी करतो असे म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि वादावादी सुरू झाली.
एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकारही घडला. बँकेचे अध्यक्ष मानसिंग नाईक यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेतून बाहेर पडल्यानंतर हणमंतराव देशमुख यांनी पाटील यांच्याविरुध्द जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांच्याकडे केली आहे.ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टोळीला सांगली पोलिसांचा दणका, 27 बॅंकेतील 7 कोटी 81 लाख रुपये गोठवले.ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून दुप्पट पैशाचे अमिष देऊन कोट्यावधी रुपयांचा फसवणूक करणाऱ्या एका टोळीचे कोट्यावधी रुपये सांगली पोलिसांनी गोठवले आहेत.तब्बल 27 बँक अकाउंट मधून 7 कोटी 81लाखांची रक्कम गोठवण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे. इस्लामपूर येथील हर्षवर्धन विश्वास पाटील,या इसमाचे कॅपिटलएक्स ऑनलाईन टेलिग्राम ग्रुप वरून चॅटिंग करून दुप्पट पैशाचं अमिष दाखवत, ऑनलाईन ट्रेडिंग करण्यास सांगण्यात आले, त्यानंतर पाटील यांना वेगवेगळे अकाउंट नंबर देऊन त्यात रक्कम गुंतवण्यास सांगण्यात आले, त्यानुसार पाटील यांनी 21 लाख 10 हजार रुपये गुंतवले.यानंतर आपली फसवणूक झाल्याची बाग लक्षात आल्यावर पाटील यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती, त्यानंतर सांगलीच्या सायबर गुन्हे शाखेने तातडीने तांत्रिक दृष्ट्या सखोल तपास करून फसवणूक केलेल्या कंपनीच्या 27 वेगवेगळ्या बँक खाते आणि त्यातील सात कोटी 81 लाख गोठवली आहेत,अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली असून सोशल मीडियावरून होणाऱ्या ऑनलाइन ट्रेडिंग द्वारे ज्यादा पैसे मिळवण्याचे अमिष दाखवणाऱ्या टोळी पासून सावधान राहण्याचा आवाहन करत कॅपिटलएक्स टेलीग्राम ग्रुप व इतर टेलिग्राम वरून,अशा प्रकारची जर कोणाची फसवणूक झाली असेल, त्यांनी सांगली सायबर पोलिसांची संपर्क साधावा,असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक तेली यांनी केले आहे.Washim News : युरियाचा तुडवडा; विद्यार्थ्यांना निकृष्ट पोषण आहार, वाशिम जिल्ह्यातील टॉप 5 बातम्यासांगली महापालिकेच्या मासिक महासभेत राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गटाचे नगरसेवक आमनेसामने भिडले :सांगली महापालिकेच्या मासिक महासभेत राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार गटाचे नगरसेवक आमने सामने भिडले.
एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार घडल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. प्रभाग 20 मधील विकास कामाच्या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव अजितदादा गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी घेतल्याने जयंत पाटील गटाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यानंतर अजित पवार गटाचे नगरसेवक आणि शरद पवार गटाचे नगरसेवक एकमेकात भिडले. यावेळी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि मैनुद्दीन बागवान, संगीता हारगे यांच्यात जोरदार वादावादी झाली.प्रभागातील विकास कामावरून राष्ट्रवादीचे दोन्ही गट सभागृहात संतप्त झाल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
अखेर वाद वाढल्याने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दोघा नगरसेवकाचे निलंबन करीत त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले. यामध्ये महापौरांनी अजित पवार गटाचे योगेंद्र थोरात आणि जयंत पाटील गटाच्या संगीता हारगे यांचे निलंबन केले आणि त्यांनतर पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाले होते.. दरम्यान गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी थोरात व हारगे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी व त्यांना शेवटच्या सभेला उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापौरांकडे केली होती. महापौर सूर्यवंशी यांनी त्यांचे निलंबन मागे घेतले आहे.
तसे आदेश त्यांनी नगरसचिव चंद्रकांत आडके यांना दिले.संपूर्ण राज्यातून मोटारसायकल चोरणारी तिघांची टोळी जेरबंद : ७ लाख ६३ हजाराच्या तब्बल १७ चोरीच्या मोटारसायकली जप्त.सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या तिघांकडून ७ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या १७ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी नामदेव बबन चुनाडे, महादेव भारत भोसले, गणेश भारत भोसले या तिघांना अटक केली आहे. 31 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास संजय भानुसे यांच्या दारातून मोटारसायकल चोरीस गेली होती.
त्यांच्या फिर्यादीवरून प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा पोलिसांचे एक पथक तपास करीत होते.यावेळी एक इसम मुंबई तळे येथे संशयितरित्या मोटारसायकल वरून वावरत आहे अशी माहिती मिळाली. यावरून सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आष्टा येथील भानुसे यांच्या मोटारसायकलसह एकूण 17 मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. या मोटारसायकली विक्री करण्यासाठी साथीदार महादेव भोसले व गणेश भोसले यांच्याकडे दिल्याचे सांगितले. यावरून आष्टा पोलिसांनी त्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विना नंबर प्लेटच्या 11 स्प्लेन्डर प्लस, 1 बुलेट, 1 युनीकॉर्न, 1 होंडा शाईन, 2 हिरो एच.एफ.डीलक्स व एक तोडलेली स्प्लेन्डर जप्त केली. सदर मोटारसायकली आष्टा, हडपसर पुणे, जेजुरी, कोरेगाव, पुसेगाव, फलटण, पुणे शहर या ठिकाणाहून चोरीला गेल्या असल्याचे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद होते. याचा उलगडा आष्टा पोलिसांनी केला.