ताज्या बातम्या

आमदार किशोर पाटील यांच्याकर गुन्हा दाखल करा ! 11 पत्रकार संघटनांची राज्यपालांकडे मागणी


जळगाव पाचोरामधील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी पत्रकाराला केलेल्या मारहाणप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलमानुसार पाटील यांच्याकर गुन्हा दाखल करा आणि कठोर कारवाई करा, अशी मागणी आज मुंबईतील 11 पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन केली.

दरम्यान, या विषयात जातीने लक्ष घालू, असे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिले.

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ करून दुसऱ्या दिवशी गुंडांकरवी मारहाण केली. याची प्रतिक्रिया राज्यभर उमटली. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील प्रमुख 11 पत्रकार संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. त्यानंतर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन पाटील यांच्याकर कारवाई करावी आणि पत्रकार संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी प्रतिनिधींनी केली. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, क्राईम रिपोर्टर असोसिएशन, पॉलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोसिएशन, म्हाडा पत्रकार संघ, मुंबई महापालिका पत्रकार संघ इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, हल्ल्याचा निषेध करण्यासाठी 17 ऑगस्टला मुंबईसह राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *