मुंबई

उद्यापासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; कुठे दिलाय अलर्ट ? हवामान विभागाने काय म्हटलंय?


राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत आहे. मात्र पुन्हा एकदा १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असून, मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

मुंबई – जुलै महिन्यात पावसाने (Rain) जोरदार बॅटिग केली. राज्यातील कोकण मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, रायगड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील काही जिल्हे, यवतमाळ, मराठवाडा येथे मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता रविवारपासून म्हणजे (१३ ऑगस्टपासून) राज्यात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून (Meteorological Department ) अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच राज्यात १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार, तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. (Heavy rain again in the state from August 13; What has the weather department warned? What is the rainfall status in your district)

१५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस.

दरम्यान, जून महिन्यात पावासाने दडी मारली होती. यावर्षी मान्सूनचे उशिरा आगमन झाले. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडला. मात्र ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाचा जोर कमी झाला. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ऑगस्टपर्यंत राज्यात तूरळ‍क ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, चार ऑगस्टपासून तर नऊ ऑगस्टपर्यंत बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस धो..धो कोसळणार आहे. १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

एल निनोचा पावसावर प्रभाव

जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात पाऊस पडला नाही. मात्र, शेवटच्या आठवड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. तसेच ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाने उसंत घेतली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत आहे. मात्र पुन्हा एकदा १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असून, मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *