ताज्या बातम्या

त्यानं मला गाडीतून उतर सांगितलं अन्…’, वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा ‘तो’ किस्सा


लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या सध्या त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

वंदना गुप्ते या नेहमीच मोकळेपणानं बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका कार्यक्रमात वंदना गुप्ते यांनी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत आलेला एक अनुभव सांगितला आहे. सुरुवातीला वंदना गुप्ते यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रिचा एक अनुभव सांगितला आणि त्यानंतर एकदा राज ठाकरे यांनी वंदना गुप्ते यांना त्यांच्याच नव्या गाडीतून खाली उतरवलं आणि त्यांच्या गाडीचं प्लास्टिक हाताना काढलं याविषयी सांगितलं आहे.

वंदना गुप्ते यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. अवधूत गुप्ते यांच्या या कार्यक्रमात वंदना गुप्ते मोकळेपणानं बोलताना दिसल्या. त्यांच्या या कार्यक्रमात वंदना गुप्ते यांनी अनेक गोष्टींविषयी सांगितलं. यावेळी अवधूत गुप्ते वंदना गुप्ते यांना प्रश्न विचारत म्हणतात की राज ठाकरेंनी गाडी थांबवून तुमच्या गाडीचं प्लास्टिक फाडलं होतं? त्यावर उत्तर देत म्हणाल्या की ‘मी नवीन गाडी घेऊन त्या गल्लीतून येत होते आणि राज नेमका तिथे फेऱ्या मारत होता. ही चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तर नवीन गाडी म्हटल्यावर सीटवर, फ्लॅपवर प्लास्टिक असतंच ना… मी काय ते काढलं नव्हतं. मी गाडी घेऊन येत होते. मला बघून तो म्हणाला, ‘उतर पहिले त्या गाडीतून.’

त्यानंतर पुढे काय झालं हे सांगत वंदना गुप्ते म्हणाल्या, राजनं मला उतर म्हटल्यानंतर मी त्याला म्हटलं अरे का पण? तर तो म्हणाणा, इथे मराठी माणूस दिसतो. कशाला ते प्लास्टिक ठेवायचंय? कशाला वाचवायचंय, कुठे काही डाग पडेल याची भीती वाटते का तुला? असं विचारलं. मग त्याच्या या प्रश्नावर मी म्हटलं की, अरे घरी जाऊन काढते. तर त्याने ऐकलं नाही. सरळ गाडीची काच खाली करायला लावली आणि फ्लॅपवरचं प्लास्टिक फराफरा ओढून फाडून टाकलं.’

हेही वाचा : सुनिल शेट्टी यांचं खंडाळ्यातील फार्महाऊस पाहिलं का? राजवाड्यापेक्षा नाही कमी

दरम्यान, राज ठाकरे यांनी बाईपण भारी देवा पाहिला आणि पुरुषांना एक सल्ला दिला आहे. खरंतर राज ठाकरे यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर या दोन दिग्गजांनी केदार शिंदे आणि चित्रपटातील अभिनेत्रींच्या उपस्थितीत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिला होता.राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ वंदना गुप्ते यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत राज ठाकरे म्हणतात की ‘जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा घरी येऊन बायकोला याच्या कथेबाबत सांगितले. माझ्या पत्नीशी चर्चा करताना मी म्हणालो, ‘हा बायकांप्रमाणे प्रत्येक पुरुषाने पाहावा असा चित्रपट आहे. आपल्या माता-भगिनी कशामधून जात असतात हे प्रत्येक पुरुषाने समजून घेण्याची गरज आहे.’


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *