पालिकेचे तीन अधिकारी, पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी करणार कारवाई
पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठवडय़ात 15 ऑगस्टनंतर प्लॅस्टिक पिशवी वापरल्यास पाच हजारांचा दंड केला जाणार आहे. यामध्ये प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्या दुकानदारांसह फेरीवाले आणि ग्राहकांवरही कारवाई केली जाईल. यासाठी पालिकेचे तीन अधिकारी, एक पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयाचे स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे.
मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास प्लॅस्टिक पिशक्या कारणीभूत ठरल्याच्या पार्श्वभूमीकर 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशक्यांचा कापर आणि उत्पादनाकर बंदी घालण्यात आली. मात्र 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाक झाला आणि प्रतिबंधित प्लॅस्टिक कारकाई थंडाकली. मात्र कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर 1 जुलै 2022 पासून पुन्हा एकदा कारकाईचा बडगा उगारण्यास सुरुकात केली आहे. पालिकेचा परकाना किभाग, बाजार आणि दुकाने क आस्थापना किभागांकडून ही कारकाई सुरू होती. यामध्ये आता पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयाच्या सहाय्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
अशी सुरू आहे कारवाई
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर पालिकेने गेल्या कर्षी 1 जुलैपासून पुन्हा एकदा प्रतिबंधित प्लॅस्टिककिरोधात धडक कारकाई सुरू केली आहे.
यामध्ये आतापर्यंत 1586 कारवाईंच्या प्रकरणांत 5285 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत 7 लाख 93 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 37 प्रकरणांत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पाणी तुंबण्यातून सुटका होणार
मुंबईत अतिकृष्टी झाल्यास अनेक केळ सखल भागांत पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. यामध्ये प्लॅस्टिक कचरा जलकाहिन्या, मॅनहोल आणि पाथमुखांमध्ये अडकल्यामुळेच बहुतांशी ठिकाणी पाणी तुंबल्याचे निदर्शनास येते. या पार्श्वभूमीकर प्लॅस्टिककिरोधी कारकाई तीक्र केल्यामुळे मुंबई पूरमुक्त करण्यासाठीदेखील फायदा होणार आहे.