ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. फ्लाईंग किस मुद्यावरुन राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून टीका होत आहे.
यावर दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली.
मुंबईत भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. यावर अंबादास दानवे म्हणाले, किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओवर काय कारवाई केली हे आधी स्पष्ट करावे. या संदर्भात मी स्वत: विधान परिषदेत सभापतींना तो व्हिडिओ दिला आहे. अनेक चॅनलवर तो प्रसिद्ध झाला आहे. यांनी राहुल गांधी विषयावार आम्हाला शिकवण्याची गरज नाही.
सुर्वे यांचा देखील किस घेतानाचा व्हिडीओ फेसबुकवर आला होता, त्यावर बोला. मग राहुल गांधी प्रकरणावर बोला, असे अंबादास दानवे म्हणाले.
भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ चा नारा दिला आहे. यावर दानवे म्हणाले, भाजप ४५ नाही तर ५४ देखील म्हणतील. भाजपचं डोकं फिरलं आहे. ४५ त्यांची जहागीरी आहे का?. सर्व्हे बाहेर येत आहेत. महाराष्ट्राची जनता भाजपला ४ ते ५ जिंकून देईल, असे दानवे म्हणाले.
No Confidence Motion: मतदान एक, व्हीप दोन; संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप, कायदेशीर लढाईचे संकेत?
पालकमंत्री पदावरून सुरु असलेल्या गोंधळावर अंबादास दानवे म्हणाले, तीन तोंडी सरकार आहे. खातेवाटपाला दिल्लीला जाव लागत. आता पालकमंत्री पदासाठी देखील दिल्लीत हुजरेगिरी करावी लागेल.
अंबादास दानवे म्हणाले, नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर अमिरेकेत काय केलं? जुन्या गोष्टी उखरून काढणार. मात्र ते त्यांच्या चुका सांगणार नाहीत. त्यांनी मणिपूर मुद्यावर बोलावं.
RBI MPC Meeting: रेपो रेटवर RBIने घेतला मोठा निर्णय, गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे