महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनाऱ्यावर स्थापन झाल्याचा निष्कर्ष नेवाशातील उत्खननानंतर काढण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ‘दायमाबाद’ येथे ताम्र-पाषाणयुगीन अवशेष मिळाले आहेत. नेवासे तालुक्याच्या गावाजवळ अश्मयुग ते इतिहासकाळ यादरम्यानच्या संस्कृतीचे अवशेष असलेली टेकाडे आहेत. बहमनी वंशाच्या सत्तेचे तुकडे होऊन मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी वसवलेले नवीन शहर म्हणजे आजचे अहमदनगर होय. हेच शहर अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. पुढे काही काळानंतर सन १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून नगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता.
: अहमदनगर जिल्हा संक्षिप्त माहिती
१. भौगोलिक स्थान : गोदावरी खोरे व भीमा खोरे या भागात पसरलेल्या या जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्ह्याचा इगतपुरी तालुका, उत्तर-पूर्वेस औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा, दक्षिणेस सोलापूर जिल्हा व दक्षिण-पश्चिमेस ठाणे जिल्हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर याच डोंगररांगामध्ये आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्चंद्राचे डोंगर या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बालाघाटचे पठार या नावाने संबोधला जातो.
२. प्रमुख पिके : ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून, ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून, जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे. अलीकडच्या काळात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीच्या फुलांना मागणी असते.
३. नद्या व धरणे : अहमदनगर जिल्ह्यात गोदावरी व भीमा
यांच्याशिवाय प्रवरा, अडुळा, म्हाळुगी, मुळा, ढोर, घोड आणि सीना या नद्या असून, विसापूरचा तलाव हा एक नैसर्गिक तलाव आहे. अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले असून, या धरणाचा भारतातील सर्वात जुन्या धरणामध्ये समावेश केला जातो. मुळा नदीवर राहुरी तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण बांधण्यात आले असून, येथील जलाशयास ज्ञानेश्वर सागर असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा
सर्वात जास्त आहे.
४.उद्योग व व्यवसाय: अहमदनगर जिल्हा सहकारी साखर
कारखान्याच्या संख्येबाबत राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी जून, १९५० मध्ये (प्रवरानगर) येथे सुरू केला. अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी, जामखेड व संगमनेर या ठिकाणी महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत. संगीत क्षेत्रातील वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्य आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ
झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते.
५.दळणवळण : अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०
व राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ जातो. अहमदनगर हे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे.
अहमदनगर जिल्ह्याची वैशिष्ट्ये
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात
‘भंडारदरा’ हे थंड हवेचे ठिकाण आहे.
महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ सन १९६८ मध्ये राहुरी येथे स्थापन झाले.
अहमदनगर हे लष्करीदृष्ट्या भारतातील महत्त्वाचे ठाणे असून
येथे उभारलेले रणगाडा संग्रहालय हे आशिया खंडातील एकमेव
संग्रहालय आहे.
अहमदनगरचा भुईकोट किल्ला व चांदबिबीचा महाल ही ऐतिहासिक स्थळे प्रसिद्ध आहेत. सन १९४२ च्या चले जाव आंदोलन काळात पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेत्यांना अटक करून येथील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते . येथेच नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला.
अकोले तालुक्यात जगप्रसिद्ध भंडारदरा धरण, रंधा धबधबा व सर्वात उंच कळसूबाई शिखर आहे.
श्रीरामपूर येथे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे.
श्री संत ज्ञानेश्वरांनी ज्या खांबास टेकून ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली, त्या पैशाच्या खांबाभोवती मंदिर बांधलेले आहे. नेवासे येथील उत्खननात आद्य इतिहासकालीन अवशेष सापडलेले आहेत. * राळेगणसिद्धी हे गाव पारनेर तालुक्यात असून, थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचे जन्मगाव आहे. भारतातीलच नव्हे, तर आशियातीलदेखील आदर्श गाव म्हणून अण्णांनी या गावाचे परिवर्तन केले आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुकडी नदीपात्रात येथे प्रवाहामुळे खडक घासले जाऊन नैसर्गिक दगडी खळगे/ रांजण खळगे (पॉट होल्स) निर्माण झाले आहेत. येथेच वडगाव दर्या येथे खडकाच्या खोबणीत वरून लोंबकळणारे ‘लवण स्तंभ’ आहेत.
साईभक्तांचे शिर्डी श्रद्धास्थान याच जिल्ह्यात आहे.
‘भंडारदरा’ हे धरण प्रवरा नदीवर बांधण्यात आले असून, यास पूर्वी ‘विल्सन बंधारा’ म्हणून ओळखले जात असे. या धरणातून
सोडलेल्या पाण्यामुळे रंधा धबधबा’ निर्माण झाला आहे.
कर्जत तालुक्यातील ‘सिद्धटेक’ हे ठिकाण अष्टविनायकांपैकी एक ठिकाण असून, येथील गणपतीस ‘सिद्धिविनायक’ म्हणून संबोधले जाते. *क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. *अहमदनगर हा राज्यातील सर्वाधिक सिंचनक्षेत्र असलेला जिल्हा. *भंडारदरा धरणाच्या जलाशयास आर्थर सरोवर म्हणतात.
महाराष्ट्रात सर्वप्रथम (१९४८ मध्ये) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस अहमदनगर-पुणे या मार्गावर धावली.
भारताची साखरपेठ’ म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव. ओळखले जाते.
सांख्यिकीक अहमदनगर
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ =१७,०४८चौ.किमी.
२. जंगलाचे प्रमाण =१०.९४%
३. अभयारण्ये =०३ रेहेकुरी काळवीट अभयारण्य,माळढोक पक्षी अभयारण्य व कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्
( आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय= नाशिक विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय = अहमदनगर
३. उपविभाग= ७ संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी,अहमदनगर, कर्जत, शिर्डी व श्रीगोंदा-पारनेर
४. तालुके =१४ कोपरगाव, अकोले, संगमनेर,श्रीगोंदे, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, शेवगाव, पारनेर, नेवासे, पाथर्डी, कर्जत,
जामखेड (महाल), राहता.
५. पंचायत समित्या =१४
६. ग्रामपंचायत= १३१२
७. महानगरपालिका=०१अहमदनगर महानगरपालिका
८. नगरपालिका= १०
९. नगरपंचायत= ०१जिल्हा पोलीस अधीक्षक
१०. पोलीस मुख्यालय =०१
११. पोलीस स्टेशनची संख्या= २६
(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या =४५,४३,१५९
२. साक्षरता =७९.०५%
३. लिंग गुणोत्तर =९३४
४. लोकसंख्येची घनता =२६६