ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

माझी सीमा हैदरशी तुलना करू नका, मी लवकरच…”; अंजूने भारतात पाठवला संदेश


आजकाल सीमा हैदर आणि सचिनची.   प्रेमकहाणी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. असाच एक प्रकार यूपीतील जालौनमधून समोर आला आहे. येथे राहणाऱ्या अंजूने देशाची सीमा ओलांडली आणि तिच्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तान गापाकिस्तानच्या तपास यंत्रणांच्या परवानगी नंतर रविवारी तिला प्रवेश देण्यात आला. सीमा हैदरनंतर अंजूच्या प्रकरणाची चर्चा रंगली असताना, अंजूने सीमेपलिकडून एक संदेश दिला आहे.

 

34 वर्षीय अंजूचा जन्म जालौनच्या केलौर गावात झाला. अंजूने 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानातील नसरुल्लाहशी मैत्री केली. त्यांचे चॅटिंग सुरू राहिले आणि त्यानंतर अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तान व्हिसावर तिकडे गेली. एका लग्न समारंभाला हजेरी लावण्यासाठी आलो असून भेटून मी परतणार असल्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर सांगितला. मात्र, अंजूचा पती अरविंद सांगतो की, अंजू पाकिस्तानात कशी पोहोचली, याची मला स्वतःलाच माहिती नाही.

 

अंजू म्हणाली- माझी तुलना सीमा हैदरशी करू नका!

 

अंजू तिच्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी कायदेशीर व्हिसा घेऊन गेली आहे. पाकिस्तानच्या तपास यंत्रणेने तिला देशात येण्याची परवानगी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंजू वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात घुसली आणि तिथून इस्लामाबादला गेली. ती वैध व्हिसावर आली असल्याने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती होती. तिची त्यांनी कसून चौकशी केली. अंजू सध्या खैबर प्रांतातील मलाकंद जिल्ह्यात असून सुरक्षा पथकाने तिची चौकशी केली. व्हिसानुसार तिला ३० दिवस पाकिस्तानात राहण्याची परवानगी आहे.

 

पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूने सोशल मीडियावरून थेट एक संदेश जारी केला आणि मीडियाला विनंती केली की मी येथे कायदेशीररित्या इथे आले आहे आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. मी दोन-चार दिवसात भारतात परत येणार आहे. मी पूर्वनियोजित प्लॅननुसार इथे आलो आहे आणि त्याच पद्धतीने परतदेखील येणार आहे. माझ्या नातेवाईकांना आणि माझ्या मुलांना प्रश्न विचारून त्रास देऊ नये.

 

पण, अंजूचा फेसबुक फ्रेंड नसरुल्ला हा वैद्यकीय प्रतिनिधी आहे. तो अंजूशी लग्न करणार असल्याचा दावा करत आहे. अंजू भारतात परतल्यानंतर पुन्हा पाकिस्तानला येणार आणि त्यानंतर ते दोघे लग्न करणार आहेत असा दावा त्याने केला आहे.

 

अंजूचे 2007 मध्ये लग्न झाले…

 

अंजूचे लग्न बलिया येथील अरविंदसोबत झाले. हिंदू असूनही अंजूने ख्रिश्चन धर्म स्वीकारून लग्न केले. अंजूचे पती अरविंद यांना अंजू पाकिस्तानात आल्याचे समजताच त्यांनी अंजूला परत बोलावण्याचे आवाहन सरकारला केले. त्याच वेळी अंजू म्हणाली की माझे आणि पतीचे नाते फारसे चांगले नाही, ते त्रास देतात आणि तिला त्यांच्यापासून दूर राहायचे आहे.ठले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *