टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर हे काय बोलले सदाभाऊ खोत,’परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका’
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या किंमती 150 रुपये प्रति किलोच्याही पुढे गेल्या आहे. 20-25 रुपये प्रति किलो मिळणारे टोमॅटो अचानक 150 पार गेल्याने सर्वसामान्यांना ते खरेदी रणे यावरच आता क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केलेलं विधान चर्चेत आलेआहे. ‘परवडत नसेल तर टॉमेटो खाऊ नका’ खोत म्हणाले आहेत.
सदाभाऊ खोत म्हणाले आहेत की, ”ज्याला परवडत नसेल त्यांनी दोन, तीन महिने टोमॅटो खाऊ नका. टोमॅटो नाही खालं तर कोण मरत आहे का? नका खाऊ टोमॅटो.” ते पुढे म्हणाले, ”टोमॅटोच्या महामारीमुळे सुद्धा रोज मरणाऱ्यांचा आकडा वाढत आहे का. यामुळे दवाखानेही भरलेले आहेत. सगळे डॉक्टरही चिठ्ठीवर टोमॅटो असं लिहून देत आहेत. कारण आता एकच औषध टोमॅटो आहे.” टोमॅटो मिळाला नाही म्हणून लगेच दोन-चार जण टाचा खुडून मेलेत का टोमॅटो हा काही अॅटम बॉम्ब नाही. जरा दोन-तीन महिने कड मारा. त्यानंतर ज्याला ज्याला लय टोमॅटो लागतात, त्यांना आम्ही सरणाला पण टोमॅटो देऊ. मग सरणासाठी लाकडं वापरुच नका, जाळण्यासाठी फक्त टोमॅटोच वापरा. आपल्याकडे काय फक्त टोमॅटोच आहेत का, असा सवालच खोत यांनी माध्यमांशी बोलतांना उपस्थित केला आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या टोमॅटोच्या वाढत्या दराची चर्चा सर्वत्र होत आहे.
तत्पूर्वी, सरकारने आता यावर उपाय काढला असून 14 जुलैपासून टोमॅटोच्या किंमती कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी मयांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर कमी दराने टोमॅटोचे वाटप केले जाणार आहे. 14 जुलैपासून टोमॅटो दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून कमी दराने विकले जातील, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.कठीण झाले आहे.