ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

पुणे जिल्हा : राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करणार -गारटकर


अजित पवार यांनी दिले जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र इंदापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करणार असून, थेट गाव पातळीच्या वाडीवस्तीपर्यंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शाखा तसेच सरकारच्या विविध योजना जिल्ह्यातील जनतेपर्यंत सोयीस्कररीत्या कशा पोहोचवता येतील.

यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, प्रदीप गारटकर यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रदीप गारटकर यांची मंगळवारी (दि. 11) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, बाळासाहेब करगळ, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, युवक नेते संग्रामसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

गारटकर म्हणाले, राज्यातील गोरगरिबाचा आधार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी काम करीत असून, उपमुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारमध्ये अजितदादा पवार यांची झालेली सार्थ निवड, आगामी काळात पुणे जिल्ह्याचा अधिकचा विकास करण्यासाठी होणार आहे. पक्ष संघटन प्रत्येक तालुक्‍यात ग्रामीण भागात मजबूत असून, नव्या चेहऱ्यांना युवकांना संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *