ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल पाटलांच्या स्वागतासाठी रस्त्यावर शाळकरी मुलांना उभे केले! अमळनेरातील संतापजनक प्रकार


    राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून मंत्रिपद मटकावल्यानंतर अनिल पाटील पहिल्यांदाच अमळनेरात आले.अमळनेरातील अजित पवार समर्थकांनी अनिल पाटलांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाळकरी मुलांना अनेक तास उभे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलायामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून अनिल पाटील हे अजित पवार गटामध्ये गेले. त्याबद्दल त्यांना मंत्रिपदाची बक्षिसीही मिळाली. मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अनिल पाटील हे आपल्या मतदारसंघात परतले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी शहरातील शाळांवर दबाव आणून लहान लहान शाळकरी मुलांना रस्त्याच्या दुतर्फा अनिल पाटलांचे स्वागत करण्यासाठी उभे केले.

बराच वेळ हे चिमुकले अनिल पाटलांच्या स्वागतासाठी ताटकळत उभे होते. उभे राहणे अशक्य झाल्यानंतर बरीच मुले पावसाने ओलसर झालेल्या मातीवर बसली. शाळकरी मुले ताटकळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. मंत्र्यांचे सरंजामी स्वागत करण्यासाठी चिमुकल्यांना वेठीस का धरण्यात आले? मुळात शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कशी परवानगी दिली? असे सवाल पालकांनी केले आहेत.

संबंधित बातम्या या पब्लिशरकडू

न आणखी आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *