ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

राज्य मंत्रीमंडळ विस्तार होणार; अजून १३ मंत्र्यांच्या जागा भरणार – शंभुराज देसाई


राज्याच्या मंत्रीमंडळात आतापर्यंत ३० मंत्र्यांच्या जागा भरल्या आहेत. अजून १३ जागा भरायच्या आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार ,असे सुतोवाच राज्य उत्पादन शुल्कमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, यांनी स्पष्ट केले.

ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील शिंदे सरकारला एक वर्षेपूर्ण झाले. या सरकारने आतापर्यंत केलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी देसाई यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते पत्रकारांनी बोलत होते. रविवारी झालेल्या शपथ विधी सोहळ्यास अनुसरून त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी दिवसभर मुख्यमंत्र्यासोबत होतो. पण या शपथ विधी सोहळ्याची कल्पना मलाही नव्हती. राजभवनकडे जाण्यास सांगितले आणि हा शपथ विधी पार पडला. मंत्रीमंडळ विस्तार होण्या आधीच विरोधी पक्षनेत अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची व त्यांच्या सहकारी आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही की कसे, असे त्यांना विचारले असता ते म्हणाले,’अजून १३ जागा भरायच्या आहेत. त्यासाठी घेतलेल्या निर्णयानुसार मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे देसाई यांनी पत्रकारांना सांगितले. या शपथ विधीमुळे आमच्या आमदारांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत आमचार डॉ. बालाजी किणीकर, शांताराम मोरे आदी आमदारांसह ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि अन्यही अधिकारी उपस्थत होते.

महायुतीच्या डबल इंजिन सरकारला आता अजून एक इंजिन लागले आहे. त्यामुळे मेंट्रोट्रेन, सुपरफास्ट बुलेट ट्रेन पेक्षा अधीक वेगाने सरकार धावेल आणि राज्य अधीक वेगाने पुढे जाईल, अशी अपेक्षाही देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. रिक्त जागा भरून १०० टक्के कार्यक्षमतेने मंत्रीमंडळ कार्यांवित करण्याचा निर्णय आमचे नेते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पण राज्याला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यास अनुसरून त्यांना बोलते केले असता ते म्हणाले ‘ हा पोपट चुकीची चिट्टी काढतो. वर्षेभरापासून हा पोपट चिट्या काढत असून त्यात एकही चिट्टी खरी निघाली नाही, या पोपटाचे तुम्ही ऐकू नका, असे सांगून देसाई यांनी राऊत यांची पोपट म्हणून खिल्ली उडवली.

महापालिकांच्या निवडणुकी बाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले हा विषय न्याय प्रविष्ठ आहे. प्रभाग रचना व आरक्षणाचे न्यायालयाचे निर्देश आहे. त्याविषय राज्य शासन न्यायालयात बाजू मांडत आहे. न्यायालयीन निर्णयास अनुसरून राज्य शासन म्हणजे महायुतीचे सरकार निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. राष्टÑवादीसोबत जाणार नसल्याच्या मुद्यावर त्यांनी विचारले असता ते म्हणाले, वरिष्ठ नेत्यांनी तिसरा पक्ष सरकारमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची आंमलबजावणी करण्याचे आम्हा कार्यकर्त्यांचे काम आहे. ते आता महायुतीत सामीन झाले आहे. त्यामुळे त्यांचे पूर्वीचे धोरण बदलेल. आता आमचेही धोरण बदलेल. नवीन धोरणाप्रमाणे, नवीन सुत्राप्रमाणे आम्ही पुढे जाणार असल्याचे सुतोवाचही देसाई यांनी राष्ट्रवादी विषयी बोलताना केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *