ताज्या बातम्या

पुणे : तांदूळ, साखरेची दरवाढ; हरभरा, मसुरडाळ उतरली


पुणे : परराज्यांकडून मागणी वाढल्यामुळे साखरेची दरवाढ सुरू झाली असून गेल्या आठवडयात दरात शंभर रुपयांनी वाढ झाली. मात्र, मागणी कमी असल्यामुळे तुरडाळीची दरवाढ थांबली असून गेल्या आठवडयात दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी तर हरभराडाळ आणि मसुरडाळीच्या दरातही शंभर रुपयांनी घट झाल्याचे सांगण्यात आले.

पावसाळा लांबल्यामुळे तांदळाच्या दरात 200 ते 500 रुपयांपर्यंत दरवाढ झाली. मात्र, आवक जावक साधारण असल्यामुळे खाद्यतेलांसह अन्य सर्व जिनसांचे दर स्थिर होते.

ताण दिलेल्या पावसाने शनिवारपासून बरसण्यास सुरुवात झाल्यामुळे समाधान पसरले आहे. यामुळे धान्यांच्या दरवाढीस आळा बसेल, असा अंदाज आहे. चालू महिन्यासाठी मुबलक कोटा जाहीर झाल्यामुळे साखरेचे दर सुरुवातीस स्थिरावले होते. मात्र अन्य राज्यांकडून मागणी वाढल्याने दरवाढ सुरू झाली होती. त्यानंतर मागणी कमी झाल्याने गेल्या आठवड्यात दरात काही प्रमाणात घसरण झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात पुन्हा मागणी वाढल्याने कारखान्यांकडून साखरेच्या निविदा उंच दराने जात आहेत. यामुळे दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3750 ते 3800 रुपये होता. आवक जावक साधारण असल्यामुळे गुळाच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. उत्पादन कमी असल्यामुळे गुळाचे दर तेजीतच असून ही स्थिती कायम असल्याचे सांगण्यात आले.

तांदळाची दरवाढ
जून महिना संपत आला तरी पावसाला सुरुवात न झाल्यामुळे तांदळाच्या दरवाढीस सुरुवात झाली. गेल्या आठवडयात मसुरी, कोलम तांदळाच्या दरात 200 ते 300 रुपयांनी तर चिन्नोर, आंबेमोहोरच्या दरात 300 ते 500 रुपयांनी वाढ झाली. दरवाढ झाली असली तरी उठाव साधारणच असल्याचे सांगण्यात आले. मागणी कमी असल्यामुळे बासमती तांदळाच्या दरात कोणताही बदल आढळला नाही.

डाळींची दरवाढ थांबली
देशांतर्गत साठा कमी असल्यामुळे तुरडाळीचे दर मोठया प्रमाणात वाढले आहेत. मात्र उंच दरात मागणी कमी झाल्याने गेल्या आठवडयात दरात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी घट झाली. मागणी कमी असल्यामुळे मसुरडाळीचे दर 200 दोनशे रुपयांनी तर हरभराडाळीचे दर 100 ते 150 रुपयांनी उतरल्याचे सांगण्यात आले. मात्र अन्य सर्व डाळी-कडधान्याचें दर स्थिर होते. आवक जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ तसेच आटा, रवा आणि मैद्याचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल): 3750 ते 3800 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर): शेंगदाणा तेल 2700-2800, रिफाईंड तेलः 2475-3250, सरकी तेल 1460-1700, सोयाबीन तेल 1460-1650, पामतेल 1400-1600, सूर्यफूल रिफाईंड तेल 1470-1650, वनस्पती तूप 1460-1900, खोबरेल तेल 2250-2250 रु.तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3500, सोनामसूरी 4000-4500, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 8000-8500, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.
गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर 2600-2700 रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5500-6000, गावरान नं. 2-5000-5400, नं. 3 4500-4800, दूरी 3800-4200 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु.
गूळ : गूळ एकस्ट्रा 4200-4350, गूळ नं. 1 4050-4200, गूळ नं. 2 3900-4000, गूळ नं.3 3750-3850 बॉक्स पॅकिंग 3900-5000 रु. डाळी : तूरडाळ 13000-14000, हरभराडाळ 6000-6200, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7100-7200, मटकीडाळ 10000-11000, उडीदडाळ 11200-11300 रु.

कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा – 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000-8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-11700, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु. साबुदाणा : साबुदाणा नं.1 7500, साबुदाणा नं.2 7000, साबुदाणा नं. 3 6800 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1000-1200 रु. शेंगदाणा : जाडा 11700-12200, स्पॅनिश – 11500-11800, घुंगरु 10500-11000 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु.
मका लाल : 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 3800-4000, पेण 3800-4000, मध्यम पोहा-3500-3800, दगडी पोहा 3600-4200, पातळ पोहा 4500-5100, सुपर पोहा 4300-4600, भाजका पोहा 525, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2750-2850, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 900-950, घोटी 430, सुरती 450 रु. रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1500-1550, रवा 1550-1550, मैदा 1050-1550, बेसन :- (50 किलोस) 3350-3650 रु.
मीठ : मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 250 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ : (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1150-1250, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1400-1450, सापसोल 2000-2500 रु.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *