गुलाब शेतीमुळं स्थिरता आली, एका एकर शेतात ५ ते ६ लाखांचे उत्पन्न
वाशिम : सध्या बरेच शेतकरी आपल्या शेतात नव्याने प्रयोग करताना दिसत आहेत. त्यातून चांगलं उत्पन्न सुद्धा निघत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत अशी उदाहरण आहेत की, त्या तरुण शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी माहिती घेऊन चांगलं पीक घेतलं आहे.
अनेक शेतकरी पुर्वीसारखी पारंपारीक शेती करीत नाहीत. आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. वाशिम (washim farmer news) जिल्ह्यातील घोटा येथील युवा शेतकरी विठ्ठल तांदळे यांनी एका एकरात चांगली शेती (Farmer Success Story) फुलवली आहे. त्याचबरोबर त्यातून चांगलं उत्पन्न घेतलं आहे.
घोटा येथील विठ्ठल तांदळे यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले आहे. त्यानंतर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचा लाभ घेत आपल्या शेतात गुलाबाची शेती केली आहे. गुलाबाला कायम मागणी असल्यामुळे विक्रीतून चांगले पैसे मिळत आहेत. त्यांची शेती पाहायला आणि त्याच्याकडे मार्गदर्शनला भागातले अनेक शेतकरी येत आहेत.
सध्याच्या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतं आहे. त्याचबरोबर पारंपारिक शेतीतून अधिक उत्पन्न मिळत नाही. घोटा येथील युवा शेतकरी विठ्ठल तांदळे यांनी सहाय्यक कृषी अधिकारी अनिल जयताडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पुणे येथून गुलाबाची रोपं आणली. त्यांनी दोन वर्षापूर्वी रोपं आणली होती. ती आता चांगलीचं बहरली आहेत. वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यात गुलाबाला अधिक मागणी आहे. शेतकरी विठ्ठल तांदळे यांनी ५ ते ६ लाखांचे उत्पन्न घेतलं आहे.
गुलाबाची शेती करणं हे विठ्ठल तांदळे यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. माहिती नसताना शेती फुलवणं त्यांच्यासाठी एकदम कठीण काम होतं. त्यांनी फुलशेतीत दुष्काळी पट्ट्यात यशस्वी शेतीचे चांगले प्रयोग केले आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी सुध्दा अशा पद्धतीने शेती करण्याचं आवाहन केलं आहे.