ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रवर्धा

एसआयटीचे पथक गुजरातला होणार रवाना; बोगस कापूस बियाणे कारखाना प्रकरण


वर्धा : वर्ध्यातील म्हसाळा परिसरात सुरू असलेल्या कपाशीच्या बनावट बियाणे कारखान्यावर पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या सूचनेनुसार छापा टाकून सुमारे १ कोटी ५१ लाख ८२ हजार रुपयांचे बियाणे जप्त केले होते.  पोलिसांना  प्रकरण ‘मॅनेज’ करण्यासाठी तब्बल ३० लाख रुपयांची ‘ऑफर’ मुख्य सूत्रधार राजू जयस्वाल याने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र, पोलिसांनी या ऑफरला पायदळी तुडवून या टोळीचा पर्दाफाश केला. प्रकरणाच्या तपासाकरिता पोलीस अधीक्षकांनी एसआयटीची स्थापना केली आहे. आज एसआयटीचा एक पथक गुजरात राज्यात रवाना होणार आहे.  मागील तीन वर्षांपासून राजू जयस्वाल हा बोगस  बियाण्याच्याकारभार करत होता. २०२० मध्ये तो मध्यप्रदेशच्या पांढुर्णा येथून बोगस बियाणे आणून रिपॅकिंग करत होता. तर २०२१ पासून गुजरात राज्याच्या अहमदाबाद जिल्ह्याच्या ईडर येथून बियाणे बोलवत होता. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी आज स्थापन केलेल्या एसआयटीमधील एक पथक गुजरातला जाणार आहे. गुजरात येथून प्रकरणातील अन्य आरोपीसह बियाणे निर्मितीच्या गोरखधंदा उघडकीस आणणार आहे. प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपी अटकेत असून इतर आरोपीचा शोध पोलिसांकडूनन घेतला जात आहे.  मागील तीन वर्षांपासून सुरु आलेल्या या बोगस बियाण्याच्या काळाबाजारमुळे अनेक शेतकरी फसले गेले आहे. या वर्षीही शेतकऱ्यांना (Farmer) मोठ्या प्रमाणात बोगस कपाशी बियाणे देण्याचा कट आरोपीचा होता. मात्र पोलिसांनीही तो उधळून लावत अनेक शेतकऱ्यांना संकटातून वाचविले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *