राज्यातील वातावरणात बदल होत आहे. राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे 22 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 22 जूनपर्यंत हा पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण आणि गोवा या उपविभागपर्यंतच मर्यादित असु शकतो. तळ कोकणसहीत संपूर्ण कोकण आणि गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होऊन, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते असल्याचे खुळे म्हणाले. जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. 7 जुलै नंतरच जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा. कारण 7 जुलैनंतर आठवड्यात पेरणीसाठी कदाचित उघडीपही मिळू शकते, असे खुळे म्हणाले.
23 ते 29 जुन या आठवड्यात देशाच्या संपूर्ण किनारपट्टीत पावसाच्या धन विसंगतीची म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.सध्या राज्यातील बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे.