सोनई(अहमदनगर); दर्श अमावास्येनिमित्त आज (शनिवार) शनिशिंगणापूर येथे भरलेल्या यात्रेस दिवसभरात तीन लाख भाविकांनी भेट देऊन शनिदर्शन घेतले. दिवसभर गर्दीचा ओघ होता.
देवस्थान विश्वस्त मंडळ, अधिकारी, कर्मचार्यांकडून भाविकांचे स्वागत करण्यात येत होते. शनिवारी पहाटे माजी खासदार चंद्रकांत खैरे व मेहतानी यांच्या हस्ते आरती झाली.
दुपारची मध्यान आरती झिम्बाब्वेतील शनिभक्त जयेश शहा यांच्या हस्ते झाली. सायंकाळची आरती तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा व डॉ. हेगडे यांच्या हस्ते झाली. शनिदेव सेवा समिती व मेहता परिवाराने भाविकांना चहा, खिचडी, नाश्ता व जेवणाचा प्रसाद वाटला. देवस्थानचे विश्वस्त मंडळ व उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी भाविकांचे स्वागत केले. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.