ताज्या बातम्या

बुलढाणा: हजारो आशा व गट प्रवर्तकांना दोन दिवसात मिळणार मानधन; जिल्हाव्यापी आंदोलनाचे फळ


बुलढाणा: मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित मानधनामुळे अडचणीत आलेल्या आशा व गटप्रवर्तक ह्या अत्यंत अल्प मोबदला व मानधनावर आरोग्याची महत्त्वाची कामे करतात, परंतु त्यांना मिळणारा कामाचा मोबदला हा सातत्याने उशिरा मिळतो.

जानेवारी २०२३ पासून तर आज पर्यंत गेल्या सहा महिन्याचे राज्याचे त्यांचे मानधन थकीत आहे. निधीची तरतूद असून सुद्धा आरोग्य विभागाच्या उदासीन व गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील दोन हजार आशा व गटप्रवर्तक त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित आहेत. संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे सतत यासाठी पाठपुरवा केला. प्रभारी असलेल्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र त्याकडे सतत दुर्लक्ष केले. पर्यायाने आज १५ जून रोजी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर आज आंदोलन करण्यात आले.

बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर आज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात धरणे व निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाच्या मागणीचे निवेदन नव्याने रुजू झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. हरी पवार यांना देण्यात येऊन त्यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी दोन-तीन दिवसात राज्याचे संपूर्ण थकीत मानधन आशा व गटा प्रवर्तकांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, कविता चव्हाण, विजय ठाकरे, नीता कुऱ्हाडे, स्वाती गवळी, विजया सोनपसारे, साधना गवयी, सविता पवार, प्रज्ञा धुरंदर, शारदा लिंगायत, पुष्पा सुरडकर, अनुपमा जाधव, मुक्ता काकर, कविता बडूखले,जया खंडारे इत्यादी सह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *