क्राईममुंबई

मुलगी हट्ट करते सावत्र पित्याकडून अत्याचार; पित्या विरोधात गुन्ह्याची नोंद


मुलगी हट्ट करत म्हणून सावत्र वडिलांनी आई घरात नसताना 6 वर्षांच्या मुलीला पट्ट्याने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता सांडशीने खासगी भागावर जखमा करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बोरीवलीत समोर आली आहे.

या घटनेने मुलीला मानसिक धक्का बसला आहे. अचानक हसत खेळत राहणारी मुलगी शांत झाल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेला संशय आला. तिने मुलीला विश्वासात घेत चौकशी करताच तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांनी स्थानिक पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

सतर्कतेमुळे घटना उघडकीस

पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. 6 वर्षीय मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत राहत आहे. डिसेंबर 2022 ते 28 मार्चपर्यंत सावत्र वडिलांकडून तिला मारहाण होत होती. याबाबत कुणाकडे सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी मुलीला देण्यात आली होती.

शेजारी राहणाऱ्या महिलेच्या सतर्कतेमुळे घटना समोर आली. पोलिसांनी मुलीसह आईचे ट्रामा केअरमध्ये समुपदेशन केले. तेथे मुलीला विश्वासात घेत चौकशी करताच तिने वडिलांच्या विकृतीवद्दल वाचा फोडली. बोरिवली पोलीस आरोपी सावत्र पित्याचा शोध घेत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *