सर्व संतांनी सर्व जाती धर्मासाठी आयुष्य समर्पित केले भेदभाव न करता सर्वांसाठी काम केले – कल्याण आखाडे
सर्व संतांनी सर्व जाती धर्मासाठी आयुष्य समर्पित केले भेदभाव न करता सर्वांसाठी काम केले – कल्याण आखाडे
क-हेवडगांव येथे विठ्ठल रुख्मिणी व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात
आष्टी : संत परंपरेतील संत मालिकेतील कुठल्याच संतांनी या जाती चा म्हणून त्याजातीसाठी त्यांनी कधी असा भेदभाव केला नाही सर्व संतांनी सर्वांसाठी काम केले या संतांची आदर्श शिकवण म्हणून आम्ही सुद्धा तस वागल पाहिजे तशाच पद्धतीने आमच देखील आचरण राहिले पाहिजे असे सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांनी प्रतिपादन केले ते तालुक्यातील क-हेवडगांव येथे विठ्ठल रुख्मिणी व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते.पुढे बोलताना म्हणाले की सावता महाराजांच्या भक्तीचा महिमा अगाध आहे.त्यांच्या भक्तीमुळे स्वत: पांडुरंग दर्शन देण्यासाठी सावता महाराजांकडे गेले आज वैशिष्ट्य पूर्ण परंपरा सुरू आहे.पंढरपूर वरून पांडुरंगाची पालखी अरण ला सावता महाराजांकडे आणली जाते ऐवढी अगाध महिमा आहे.ती परंपरा म्हणून कोविड मध्ये अनेक परंपरा बंद पडल्या परंतु सावता महाराजांकडे येणाऱ्या पांडुरंगाच्या पालखीचा खंड सावता परिषदेच्या माध्यमातून पडू दिला नाही राज्याचे मा.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे मागणी केली शेकडो वर्षाची परंपरा खंडित होणे चांगले नाही तेवढ्या अडचणी च्या काळात पांडुरंगाची पालखी अरण ला आणली गेली असे बोलताना म्हणाले विठ्ठल रुक्मिणी व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना पारंपरिक वाद्य टाळ मृदंगाच्या गजरात मंत्रघोषाने करण्यात आली संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मुर्तीची गावातून भव्य दिव्य मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली अबालवृद्धासह भाविक मोठ्या संख्येने मिरवणूकीत सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला लहान मुली डोक्यावर कलस घेऊन व हातात भगव्या पताका घेऊन चिमुकले व तरुण, वृद्ध,महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे अध्यक्ष स्थानी होते.तहसिलदार विनोद गुंडमवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली क-हेवडगांव नगरीत कल्याण आखाडे यांचे हलगी,संबूळ, ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी तहसिलदार विनोद गुंडमवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव धनवडे,पोलिस विकास राठोड, पोलिस भरत गुज्जर, रियाज पठाण, सावता परिषद मराठवाडा संपर्क प्रमुख विष्णू खेत्रे, सावता परिषद मराठवाडा विभागीय संघटक संदिप आस्वर,नाशिक विभागीय अध्यक्ष संतोष मोहळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रामेश्वर खामकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब वाघुले,अमोल वाघुले, वैभव आखाडे सरपंच वंदना गायकवाड,मा.सरपंच जालिंदर गायकवाड,परिवंत गायकवाड,श्रीधर खांडवे, हनुमान गायकवाड,ग्रा.पं.सदस्य जालिंदर खांडवे,गितांजली अशोक विधाते,शुभम खांडवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.