आदिवासी व भटक्या विमुक्तना सत्तेत वाटा देणारे खा. बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते – प्रा. किसन चव्हाण
आदिवासी व भटक्या विमुक्तना सत्तेत वाटा देणारे खा. बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते – प्रा. किसन चव्हाण
परभणी (प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडी प्रणित आदीवासी व भटक्या विमुक्त समन्व्य समिती व परभणी वंचित बहुजन आघाडी यांच्या विद्यमाने आदिवासी व भटक्या विमुक्त यांच्या मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शीकलगर, घीसाडी व बंजारा आणि पारधी समाज बांधवाच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ धर्मराज चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडी चे राज्य उपाध्यक्ष तथा आदिवासी भटक्या विमुक्त समन्वय समिती प्रमुख प्रा. किसन चव्हाण, शीस्तपालन समिती प्रमुख विष्णु जाधव सर, ऍड. अरुण जाधव, डॉ सुरेश शेळके, उत्तर जिल्हा अध्यक्ष सचिन गंगाखेडकर, दक्षिण जिल्हा अध्यक्ष टी. डी. रुमाले, महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता साळवे, चंदासिंग बावारी, दिगंबर घोबाळे, सुदंर्शन भारती,प्रवीण कनकुटे,गंगाधर सोडगीर, सर्जेराव पंडित, बाबुराव राठोड, चव्हाण उपस्थित होते
मार्गदर्शन करतांना प्रा. किसन चव्हाण म्हणाले
सामाजिक, आर्थिक, राजकीय शैक्षणिक अधिकारा पासून कोसो दूर असलेल्या आदिवासी व भटक्या विमुक्त या वंचित समुहाला सत्तेत वाटेकरी करण्याचा संकल्प खा. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून केला आहे. कधी नव्हे तर या समुद्यातील लहान लहान जाती ना राजकीय व सामाजिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी बाळासाहेब प्रयत्नशील आहेत,आदिवासी भटक्या विमुक्तवर अनंत लहान साहन अडचणी आहेत, गुन्हेगार जात म्हणून होणारी कूचबना, सामाजिक व राजकीय मुस्कटदाबी, प्रशासकीय हेळसांड, ह्या सर्व गोष्टी मोडीत काढण्यासाठी, गायरान जमिनी चे पट्टे, घरकुल, जातप्रमाण पत्र, घरकुल योजना या सर्व बाबी वर वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी, भटक्या विमुक्त समन्वय समिती च्या माध्यमातून राज्य भर लढा उभारण्यात येइल. दीड कोटी समाज जर बाळासाहेबच्या पाठीशी ठाम पणे जर उभा राहिला तर महाराष्ट्र ची सत्ता वंचितच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही, सत्ता असेल तर कोणासमोर हात पसरण्याची वेळ आदिवासी व भटक्या विमुक्त आणि वंचित बांधवावर येणार नाही असे प्रतिपादन त्यानीं केले, या प्रसंगी ऍड अरुण जाधव, प्रा विष्णु जाधव, डॉ धर्मराज चव्हाण यांनी आपल्या भाषणातून भटक्या विमुक्त व आदिवासी समूहाचे संचित करण्यासाठी बाळासाहेब यांनी त्याना लोकसभा, विधानसभेच्या उमेदवाऱ्या दिल्या व देशात एक आदर्श निर्माण केला आणि येणाऱ्या काळात सुद्धा आदरणीय बाळासाहेबच न्याय देऊ शकतात असे मत व्यक्त केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन अमोल ढाकणे यांनी केले व प्रस्था्विक टी. डी. रुमाले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास मस्के, लखनसिंग,संजय बनसोडे,सुधाकर दिपके आदी ने परिश्रम घेतले.
मेळावासाठी मोठया प्रमाणात आदिवासी भटक्या विमुक्त समाजातील महिला, पुरुष, तरुण, तरुणी उपस्थित होते.