ताज्या बातम्या

बीड अनाधिकृत होर्डिग्ज व बॅनरधारकांची पाठराखण केल्याबद्दल “जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन अभिनंदन आंदोलन


अनाधिकृत होर्डिग्ज व बॅनरधारकांची पाठराखण केल्याबद्दल “जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन अभिनंदन आंदोलन

बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज परीसरात अनाधिकृत होर्डिग्ज व बॅनर मुळे वाहतुकीस अडथळा व अपघातास निमंत्रण ठरत असून संबधित प्रकरणात वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असून त्यांची पाठराखण केल्याबद्दल त्याच्या निषेधार्थ आज दि.१० फेब्रुवारी शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजीमहाराज परीसरात जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांचे सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन अभिनंदन आंदोलन करण्यात येऊन जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांच्या अभिनंदनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनात रामनाथ खोड, अड.राहुल मस्के, हमीदखान पठाण सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजीमहाराज परीसरातील शहराचे वैभव असणारी “शिवसृष्टी “सारखी स्मारके झाकून गगेली आहेत तर पुतळ्याच्या सर्व बाजुंनी उंच टाॅवर उभारून आडवे तिडवे बॅनर लावलेले आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण ठरत असून अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

न्यायालयाचा अवमान, खोटे शपथपत्र दाखल
___
राज्यातील सर्व नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांनी न्यायालयात शपथपत्र दाखल करून अनाधिकृत होर्डिग्ज व बॅनर प्रकरणात कारवाई करण्याचे लेखी दिले आहे.जुन २०२२ मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केले असून सुद्धा शहराचे विद्रुपीकरण होत असताना सामाजिक कार्यकर्त्याकडुन निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कारवाई करण्यास कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तसेच उच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन झोपेचं सोंग घेतंय
__
बीड शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज व बॅनर प्रकरणात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली “भाई का बड्डे ” नगरपरिषद शोकसभा आंदोलन “तसेच “झोपा काढो आंदोलन “आदि आंदोलनानंतर सुद्धा जिल्हाप्रशासन व नगरपरिषद प्रशासन कारवाई करत नसुन झोपेचं सोंग घेत असुन याबद्दल बीडकरांमध्ये तीव्र नाराजी आहे.

लोकप्रतिनिधींकडून सुरक्षित ठीकाणी बॅनर लावण्याचे आवाहन करावे
___
बीड शहरातील विविध परीसरात महापुरूष तसेच विविध कार्यक्रम संदर्भात कार्यकर्त्याकडुन लावण्यात आलेले बॅनर वाहतुकीस अडथळा निर्माण करणार नाही तसेच अपघातास निमंत्रण ठरणार नाहीत अशा सुरक्षित ठिकाणी परवानगी घेऊनच बॅनर लावावेत असे आवाहन करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्याकडुन केली जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *