आपली माहेरी गेलेली पत्नी आणि मुले परत यावेत म्हणून नांदेड येथील एका तरूणाने गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे. नांदेडच्या शोभानगर भागात हा सगळा प्रकार घडला असून देविदास सिबिया असं या तरूणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला खाली उतरवण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ आले आहेत.
आपली माहेरी गेलेली पत्नी आणि मुले परत यावेत म्हणून नांदेड येथील एका तरूणाने गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे. नांदेडच्या शोभानगर भागात हा सगळा प्रकार घडला असून देविदास सिबिया असं या तरूणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला खाली उतरवण्यासाठी पोलिसांच्या नाकी pic.twitter.com/3XtKFK6Nmu
— NAVGAN NEWS BEED (@navgannews) January 20, 2023
नांदेड : बायको आणि मुलांना परत घरी घेऊन या, नाहीतर जीव देतो, असे म्हणत एक एकजण येथील जलकुंभावर टाकीवर जाऊन बसला आहे.
नांदेड शहरातील शोभा नगर भागातील हा प्रकार आहे.
अंबानगर मध्ये राहणारा देविदास येरगे असे या युवकाचे नाव आहे, देविदास त्याची पत्नी आणि दोन मुलांसह हैद्राबादमध्ये कामास होता. काही दिवसांपूर्वी तो नांदेडला परतला. मात्र, पत्नी मुलांसह हैद्राबाद मध्येच आहे. पत्नी नांदेडला येत नसल्याने देविदास हताश झाला होता, त्यानंतर आज सकाळी तो पाण्याच्या टाकीवर चढलाय.
स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर सकाळी 7 वाजेपासून चढला आहे. पत्नी आणि मुलांना आणण्याची मागणी तो करतोय. त्याचे काही नातलग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याला खाली उतरण्याची विनंती करताहेत. पण तो खाली उतरायला तयार नाही.