महापंगत! बुलढाण्यात 50 एकरवर 2 लाख भाविकांना एकाच पंगतीत महाप्रसाद; 100 ट्रॅक्टर्स अन् 3000 वाढपी
कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘विवेकानंद जन्मोत्सव सोहळा’ दरवर्षी साजरा करण्यात येतो
यंदा हा 160 वा जन्मोत्सव आहे , कोरोनानंतर यंदा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला .
या सोहळ्याची सांगता आज भव्यदिव्य अशा महापंगतीने झाली.
या महापंगतीच्या महाप्रसादाच्या निर्मितीच्या कामाला काल पहाटे पासूनच सुरुवात झाली
लाखो भाविकांसाठी या महाप्रसाद निर्मितीचे कार्य तब्बल 26 तासापासून सुरू आहे.
आज दुपारी तब्बल दीड ते दोन लाख भाविकांच्या एकाच पंगतीत महाप्रसादचं वितरण झालं.
राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांना तीन हजार स्वयंसेवकांच्या मदतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं.
100 ट्रॅक्टरद्वारे, तीन हजार कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्या सहाय्याने शिस्तबध्द पध्दतीने महाप्रसादाचे वितरण दुपारी करण्यात आलं .
भाविकांना 151 क्विंटल पुरी, 105 क्विंटल वांग्याची वैदर्भिय चवीसाठी प्रसिद्ध असलेली भाजी या महाप्रसादाचे वितरण झालं.
हा महाप्रसाद बनविण्यास शुक्रवारी पहाटे मुहुर्तावर प्रारंभ झाला व हजारो स्वयंसेवकांच्या मदतीने हा महाप्रसाद बनविण्यात आला आहे.